एक्स्प्लोर

Akola Accident: भरधाव वाहन काळ बनून आलं अन्..., ट्रकच्या धडकेत माजी आमदार तुकाराम बिरकडांचा मृत्यू, VIDEO व्हायरल

Akola Tukaram Birkad Accident : ‘त्या’ थरारक अपघाताचा व्हिडिओ आला समोर, भरधाव वाहन काळ बनून आले अन् अनर्थ घडला

अकोला -  अकोल्यातील मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचं काल अपघाती निधन झालं. काल (गुरुवारी, ता-14) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात तुकाराम बिरकड (Tukaram Birkad)  यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातबरोबर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

कसा घडला अपघात?

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे 800 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट लिहून तुकाराम बिरकड यांच्या निधनानंतर पोस्ट लिहली आहे. 'विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो'.

'माजी आमदार तुकाराम बिरकड हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानंच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे'.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHAMaharashtra Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 26 March 2025 : 5 PMABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
Embed widget