Akola News: अकोल्याच्या दुर्घटनास्थळी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची भेट, रुग्णालयात जाऊन जखमींचीही केली विचारपूस
Akola Accident News: घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज अकोला येथील शासकीय रुग्णालयात धाव घेवून जखमींची भेट घेतली.
Maharashtra Akola Accident News: अकोला जिल्ह्याच्या (Akola News) पारस गावातील मंदिरावर लिबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी (9 एप्रिल) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज अकोला येथील शासकीय रुग्णालयात धाव घेवून जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी पारस येथील घटनास्थळी देखील भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात 50 ते 60 भाविक असताना अचानक लिंबाचे झाड कोसळले. या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 नागरीक जखमी झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अब्दुल सत्तार घटनास्थळी पोहचले. तसेच जखमींची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पारस येथील घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्दैवी आहे. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दखल घेतली असून जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच जखमींना उपचारासाठी सरकारकडून मदत केल्या जाईल. घटनेतील जखमी हे विविध ठिकाणचे असल्याने त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी हलविण्याचा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. घटनेतील मृतांच्या वारसांना मदत देण्याबाबत मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील असे अब्दुल सत्तार म्हणाले.
फडणवीस यांच्याकडून दखल
दरम्यान या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "अकोला येथील पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरावर झाड पडलेल्या दुर्घटनेत सात जण जखमी झाले आहेत. 25 लोकं जखमी झाले आहेत. सर्व जखमी लोकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना मदत देण्याबाबतचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना देखील विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्याची" माहितीफडणवीस यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :