एक्स्प्लोर

Amol Mitkari : अमोल मिटकरींचा गावातच पराभव, काँग्रेस-भाजपच्या पॅनलचा सर्व जागांवर विजय 

Amol Mitkari : आमदार अमोल मिटकरी यांना आपल्या गावातच जोरदार राजकीय हादरा बसला आहे. अकोट तालूक्यातील कुटासा या त्यांच्या गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला

Amol Mitkari : विधिमंडळात झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आज चांगलेच चर्चेत आलेत. मात्र, आमदार अमोल मिटकरी यांना आपल्या गावातच जोरदार राजकीय हादरा बसला आहे. अकोट तालूक्यातील कुटासा या त्यांच्या गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. सोसायटीच्या  सर्व 13  जागांवर मिटकरींच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजपानेते विजयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखालील 'कास्तकार पॅनल'नं सोसायटीवर झेंडा फडकवला आहे. 

अमोल मिटकरींच्या 'ग्रामस्वराज पॅनल'चा या निवडणुकीत पुर्ण धुव्वा उडाला आहे. काँग्रेस-भाजपच्या संयुक्त पॅनलच्या विजयानं आमदार मिटकरींना अस्मान दाखवलं आहे. आज झालेल्या या निवडणुकीत 763 पैकी 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. याआधी मिटकरींच्या उमेदवाराचा कुटासा जिल्हा परिषद गटात प्रहारच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. 

..अन गावातील विरोधकांनी आमदार अमोल मिटकरींना दाखवले अस्मान :
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासामध्ये आज सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज पार पडली आहे. या सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत कपिल ढोके यांचं 'कास्तकार' पॅनलने आमदार अमोल मिटकरी यांच्या 'ग्राम स्वराज्य' पॅनलचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे. कास्तकार पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रदेश युवक  काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखालील  संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. गावातील भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयसिंह सोळंके यांच्यासोबत त्यांनी आघाडी करीत ही निवडणुक लढविली. यात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांचं संपूर्ण पॅनलचे उमेदवार पराभूत झाले आहेत. आज कुटासा सेवा सहकारी सोसायटीमध्ये 13 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत एकूण 763 मतदार होते. यातील एकूण 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

असे आहेत कपिल ढोके यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार? : 
आहाद अ. इसाक, सारंगधर इंगळे, प्रभाकर  गावंडे, सुभाष गवई, ज्ञानदेव, झामरे, सुधाकर लाखे, विठ्ठल झामरे, वैभव  झामरे, सुनंदा उगले, सागर ढोके, गणेश साबळे गणेश, शकुंतला निकम, अनंत कापस हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

असे आहेत आमदार अमोल मिटकरी यांच्या पॅनलचे पराभूत उमेदवार : 
कैलास गायकवाड़, राजू झटाले, दशरथ झामरे, माणिकराव  झामरे, सुनिल झामरे, रामभाऊ पातोंड, संतोष सदाफळे, गजानन गावंडे, मंगेश कापसे, रंजना गावंडे, अन्नपुर्णा थोरात, शिवाजी लाखे आणि गजानन लताड़. 

जिल्हा परिषदेनंतर गावात सलग दुसरा पराभव : 
कुटासा हे आमदार अमोल मिटकरी यांचं मुळ गाव आहे. दोन वर्षांपुर्वी आमदार झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणुक लढविली यात. यात त्यांनी 11 पैकी 9 जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मात्र, जानेवारी 2022 मध्ये झालेल्या कुटासा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मिटकरींच्या उमेदवाराचा पराभव करीत बच्चू कडू यांच्या प्रहारच्या उमेदवार स्फुर्ती गावंडेंनी पराभव केला होता. ही निवडणुक राज्यभर गाजली होती. आता जिल्हा परिषदेनंतर आमदार मिटकरींना सोसायटीत सलग दुसर्यांदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant On Rajan Salvi : राजन साळवींना कोणती जबाबदारी? उदय सामंतांनी सगळं सांगितलंABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 13 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAaditya Thackeray Delhi Daura : ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावरKiran Samant On Rajan Salvi : राजन साळवी, सामंतांचा एकाच गाडीतून प्रवास,बैठकीत काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का! नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला 'रामराम'
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Maharashtra Weather Update: पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
पहाटे गारवा वाढला, दुपारी उष्णतेच्या झळा कायम! राज्यात येत्या 3 दिवसांत तापमान कसे? वाचा IMD Alert
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट
शेअर बाजारातील घसरणीचा म्यूच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम, SIP च्या रकमेत घट,पाहा काय घडलं?
Rajan Salvi: एकनाथ शिंदेंनी सामंत बंधू-राजन साळवींना समोरासमोर बसवून वाद मिटवला, एकाच गाडीत बसवून घरी पाठवलं
एकनाथ शिंदेंनी सामंत बंधू-राजन साळवींकडून वचन घेतलं, वाद मिटवून एकाच गाडीने घरी पाठवलं
Thackeray Camp & Shinde Camp: मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्येही पक्षाला लागली गळती
ठाकरे गटाला लागली गळती, धडाधड राजीनामे पडले; राजन साळवी शिंदेंचा भगवा खांद्यावर घेणार
Embed widget