(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Mitkari on Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेचं अजित पवार गटात सहभागी होण्याबाबतचे शपथपत्र आपण स्वत: पाहिलंय; अमोल मिटकरींचा दावा
Amol Mitkari on Amol Kolhe : शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचं अजित पवार गटात सहभागाचं शपथपत्र आपण स्वत: पाहिल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केलाय.
अकोला : शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचं अजित पवार (Ajit Pawar) गटात सहभागी होण्याबाबतचे शपथपत्र आपण स्वत: पाहिल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केलाय. अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी स्वत: अजित दादांनी त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणले होते. दिलीप वळसे पाटलांचा तो मतदार संघ होता. त्यांना निवडून आणण्यासाठी स्वत: अजितदादा आणि दिलीप वळसे पाटलांनी (Dilip walse patil) प्रयत्न केलेत. त्यामुळे अजित दादांनी जो निर्णय घेतला असेल तो त्यांना मान्य असेल. शेवटी लोकशाही मध्ये कोणी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा आधिकार आहे. मात्र आजही ते निर्विवाद मान्य करतात, अजित दादांमुळेचं ते शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार राहिले आहे, असं देखील अमोल मिटकरी अकोला येथे बोलले.
कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर..
अजितदादांनी खासदार कोल्हेंना पराभवाचं आव्हान दिल्यानंतर त्यांनी ते स्विकारलं की नाहीय, हे स्पष्ट करावं. जर त्यांनी हे आव्हान स्वीकारले असेल तर शेवटी जनता ठरवेल, कोणाला कौल द्यायचा ते. लोकशाहीमध्ये जनता सर्वकाही असते. कोणीही त्यापेक्षा मोठे नाही. आम्ही आज महायुती मध्ये आहोत ते उद्या महायुती विरोधात लढतील, तर आम्हाला देखील महायुतीकडून उमेदवार द्यावा लागेल. त्यावेळी तिथे कोण उमेदवार द्यायचा हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ ठरवतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा हे अजित दादा ठरवतील. त्यांना तो आधिकार आहे. मात्र खासदार कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ, असं देखील मिटकरी म्हणाले.
लोकसभेत 42 च्यावर जागा येणार
आमच्या पक्षानं लोकसभेच्या 8 ते 9 जागा मागितल्यात आहेत. महायुतीच्या लोकसभेत 42 वर जागा येणार. स्वतः अजित दादा महायुती मध्ये शामिल झाल्याने निश्चित महायुतीची ताकद वाढणार आहे. त्यांना आमचा देखील पाठिंबा असून आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मी माझ्या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे. माझे पक्षश्रेष्ठी जो मला आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार-प्रसार करेल. सध्याघडीला इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी कुठलाही चेहरा नाही. जारी एक्जिट पोल विरोधात गेले तरी चार राज्यातील निकाल तुम्ही बघू शकता. त्यामुळे त्या अनुषंगाने आमचे पाऊल असल्याचे देखील अमोल मिटकरी म्हणाले.
आणखी वाचा :