मोठी बातमी : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचे आदेश
Akola : भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाल्याने लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक देखील निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.
Akola News : अकोला पश्चिम विधानसभा (Akola West Assembly) पोटनिवडणूक रद्द करण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) आदेश दिले आहे. न्या. अनिल किलोर आणि न्या. जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देतांना खंडपीठाने पोटनिवडणुक रद्द (By Election Cancelled) करण्याचे आदेश दिले आहे. अकोल्यातील शिवमकुमार दुबे नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता 26 एप्रिलला होणारी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाल्याने लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक देखील आयोगाने जाहीर केली होती. मात्र, याल विरोध होतांना पाहायला मिळाला. शेवटी प्रकरण न्यायालयात गेले. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता?, असा याचिकाकर्त्यांचा निवडणूक आयोगाला सवाल केला होता. दरम्यान, यावर निकाल देतांना न्यायालयाने निवडणूकच रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
26 एप्रिलला मतदान होणार होते.
निवडणूक आयोगाकडून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी देखील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. यासाठी 28 मार्चला अधिसूचना जारी होणार होती आणि 26 एप्रिलला मतदान होणार होते. तसेच, 4 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, आता नागपूर खंडपीठाने ही निवडणूक रद्द केली आहे.
भाजपचा पराभव होणार होता....
अकोला पश्चिम मतदारसंघाचे पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे, नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे उमेदवार साजिद खान म्हटले आहे की, न्यायालयाचे आदेश अजून पाहले नाहीये. 5 वाजेनंतर ऑर्डर कॉफी येणार. दुःख याचं होतंय की आज 'जो' आनंद होणार होता, तो आनंद सहा महिन्यावर गेलाय. भाजपचा अकोला पश्चिममध्ये पराभव होणार होता, आता सहा महिन्यानंतर तीच परिस्थिती असणार, असे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान म्हटले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीसोबत जायचं का?, प्रकाश आंबेडकरांनी बोलावली 'वंचित'ची बैठक