एक्स्प्लोर

Akola Water Crisis : अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून संरक्षण

Akola Water Crisis : कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून अकोल्यातील दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आला आहे. आता मायबाप सरकार काहीतरी उपाययोजना करेल हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

अकोला : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत असताना अकोल्यात मात्र अधिकच भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील उगवा गावात पाण्याला सोन्याचं मोल आल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे गावात असलेली तीव्र पाणीटंचाई. नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतं. त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विकत घेतलेलं हे पाणी चोरीला जावू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलूपं लावण्यात आली आहेत. कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आल्याचं दिसतंय. 

एखाद्या तिजोरीला कुलूप लावून ठेवावं तसं गावातील लोक पाण्याच्या टाकीला कुलूपं लावतात. कारण इथं सोन्यापेक्षा पाण्यालाच अधिक मोल आहे. पाण्याच्या टाकीला कुलूप लावणारं हे गाव आहे अकोला जिल्ह्यातलं उगवा. 15 हजार लोकसंख्येचं हे गाव सध्या पाणीटंचाईमुळे त्रस्त आहे.

महिनाभरानंतर नळाला पाणी येतं, तेसुद्धा अगदी थोडा वेळ. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. किमान 600 ते 700 रुपयांना छोटा टँकर मिळतो. त्यामुळे विकत घेतलेलं पाणी चोरी जाऊ नये म्हणून टाक्यांना कुलूपं लावली जातात. 

पाणी पुरवठा योजना कुचकामी

या गावामध्ये पाणीपुरवठा योजना आल्या खऱ्या, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात उगवा गाव येतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख हे तिथले आमदार आहेत. खारपान पट्ट्यातील 69 गावांसाठी 219 कोटींची योजना मंजूर झाली. पण नंतर योजनेला स्थगिती मिळाली. सध्या कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. 

आरोप-प्रत्यारोप सुरू

अकोल्याच्या उगवा गावातील पाणीप्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली. मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला. 

पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्याचं सरकारचं आश्वासन

'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातील पाणीटंचाईचं भीषण आणि दाहक वास्तव समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. अजित पवारांनी यासंबंधी आमदार अमोल मिटकरीशी संवाद साधत पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान लवकरच उगवा गावासह जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याचं आमदार मिटकरी सांगितलंय.  

कोरडेठाक पडलेले नळ... टाक्यांना लागलेली कुलूपं.. गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे.. आणि व्यक्त होणारा संताप. हे सगळं काही सांगून जातोय. पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या उगवा ग्रामस्थांची समस्या मायबाप सरकार समजून घेईल आणि उपाययोजना करेल हीच अपेक्षा. 

 

ही बातमी वाचा: 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Crime : जन्मदात्या बापाचा 8 वर्षाच्या चिमुकल्याला संपवण्याचा डाव फसला, लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाच संपवलं, घटनेनं अकोला हादरलं!
जन्मदात्या बापाचा 8 वर्षाच्या चिमुकल्याला संपवण्याचा डाव फसला, लेकाला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाच संपवलं, घटनेनं अकोला हादरलं!
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
धक्कादायक! अकोल्यात आढळला जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याची शक्यता
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
Embed widget