एक्स्प्लोर

Akola Drought News :  कुलूप बंद पाणी, दुर्दैवी कहाणी! अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा समोर; महिनाभरानंतर येतंय नळाला पाणी

Akola Drought News :  पाण्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण समजलं जातं. त्यामुळेच पाण्याला जीवन असंही म्हटले जातं. मात्र, याच पाण्याला अकोला जिल्ह्यातील उगवा गावात अगदी सोन्याची किंमत आलीये.

नळाला पाणी महिनाभरानंतर, पाणी चोरी जावू नये म्हणून कुलूपबंद ठेवण्याची वेळ

अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाच्या झळा सोसतंय. गावात प्रत्येक घरासमोर पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्यातील प्रत्येक टाकीला कुलूप लावलेलं आहे.मात्र ही कुलूपं लागलीयेत ते आपलं पाणी चोरी न जाण्याच्या भितीने. हे चित्रं आहे 15 हजार लोकसंख्येचं गाव असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या उगवा गावातलं. येथे सध्या पाणी समस्येमुळे नागरिक कासावीस झालेय. गावात सध्या पाणी पुरवठा योजनेचे नळ फक्त महिन्यात एकदाच येतात. तेही अगदी काही वेळेपुरतेच. त्यामूळे शेकडो रूपये मोजून टँकरचं विकत घेतलेलं पाणी चोरी जावू नये म्हणून ते कुलूपबंद ठेवण्याची वेळ उगवेकरांवर आलीये.

....अन् उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं 

उगवा हे गाव बाळापूर मतदारसंघात येतं. सध्या ठाकरे गटाचे नितीन देशमुख येथील आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील खारपान पट्ट्यात येत असलेल्या 69 गावांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 219 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र नंतर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या महायुती सरकारने या योजनेला स्थगिती दिलीय. आणि उगवावासियांच्या पाणी संकट कायमचं सुटण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलंय. सध्या या गावात कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरलीय. येथील गावाकऱ्यांना आता महिनाभरातून एकदाच नळाचं पाणी मिळतंय. या नियोजनशुन्यतेमूळे गावात पाण्याचा दुष्काळ पडलाय आणि याच पाण्याच्या रडगाण्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी आलंय. 

 सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा

गावात नळ महिनाभर येत नाही. मात्र, प्रशासनाने एकही टँकर गावात अद्याप सुरू केला नाहीये. त्यामूळे गावाकऱ्यांना एका छोट्या टँकरसाठी तब्बल 600-700 रूपये मोजावे लागतायेत. तर गावाच्या पाण्याच्या दुष्काळात ग्रामपंचायतीच्या लेटलतिफी आणि संवेदनेचा तेरावा महिनाही गावकऱ्यांना अनुभवावा लागतोय. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण नुकताच साजरा केलाय. चंद्रावर पाणी शोधू पाहणाऱ्या आपल्या सरकार आणि व्यवस्थेने जीवंत माणसांना प्यायला पाणी द्यावे, अशी माफक अपेक्षा त्यांना आहे. उगव्यात पाण्याच्या टाक्यांना लागलेली कुलूपं ही आपलं सरकार, व्यवस्था आणि आपल्या संस्कार आणि उच्च परंपरांचा नैतिक पराभव आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट
मुंबई इंडियन्समध्ये पडली उभी फूट; रोहित-हार्दिक वाद पुन्हा चव्हाट्यावर? सोशल मीडियावर अफवांचा स्फोट
सोन्याच्या खरेदीत भारात आघाडीवर, दरवर्षी देशात किती केली जाते सोन्याची खरेदी? जाणून घ्या सविस्तर माहिती
सोन्याच्या खरेदीत भारात आघाडीवर, दरवर्षी देशात किती केली जाते सोन्याची खरेदी? जाणून घ्या सविस्तर माहिती
Narendra Modi : शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा; नरेंद्र मोदींची देशवासियांना 10 मोठी आवाहनं
शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा; नरेंद्र मोदींची देशवासियांना 10 मोठी आवाहनं
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Embed widget