एक्स्प्लोर

Akola Crime News: गुरू-शिष्य नात्याला काळीमा; दोन शिक्षकांनी केलं चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण

Akola Crime News: दोन शिक्षकांनी चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

Akola Crime News: अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातल्या धामणदरी गावात गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्यात आले. विद्यार्थींनीनी त्यांच्यावर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची पालकांकडे वाच्यता केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. दोन्ही शिक्षकांवर बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी शिक्षक राजेश रामभाऊ तायडे आणि सुधाकर रामदास ढगे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनमुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. 
 
धामणदरीत 'गुरू-शिष्या'च्या पवित्र नात्याला काळीमा

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात धामणदरी गाव आहे. या गावात चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक आहेत. येथे चौथ्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर त्यांच्या दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दोन्ही शिक्षक मुलींना एकटे पाहून वर्गातच अश्लिल चाळे करायचे.  वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे विद्यार्थीनी भयभीत झाल्या होत्या. त्या शाळेत जायला टाळाटाळ करीत होत्या. भेदरलेल्या मुलींना त्यांच्या पालकांनी विश्वासात घेतलं. पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचं कारण विचारलं. त्या चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. सदर प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तातडीने कुटुंबीयांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन गाठलं. बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्यासमोर सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान पीडित मुलींच्या तक्रारीनंतर शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (वय 45), सुधाकर रामदास ढगे (वय 53) दोघेही राहणार अकोला यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आपल्या चिमुरड्यांना शाळेत पाठवायला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून दिली जात आहे.

त्यांनी घालवलं शाळेचं पावित्र्य

धामणदारी या गावात छोटीशी जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून दोघे शिक्षक अकोला येथून ये-जा करतात. कुणी विद्यार्थी शाळेवर आले नसल्याचे पाहून हजर असलेल्या विद्यार्थींनीसोबत हे दोघेही अश्लील चाळे करायचे. अश्लील चाळे केल्यानंतर कुणालाही सांगू नको अशी धमकीही देत होते. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुले व मुली मिळून 9 इतकीच पटसंख्या आहे.  या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हे दोन सुधाकर ढगे आणि राजेश तायडे हे दोन शिक्षक कार्यरत होते. दोघेही दररोज शाळेमध्ये हजर राहत नव्हते. एका दिवशी एकानं हजर रहायचं, असं दोघांनी ठरवलं होतं. हे दोघेही शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचे. आज अखेर त्यांच्या दुष्कृत्याचा भंडाफोड झाला. 

लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना त्वरित निलंबित करा: मनसेची मागणी

धामणदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील या दोन्ही शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. यासंदर्भात अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, महिला सेना जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंभोरे , बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सचिन पाटील गालट, मनविसेचे सौरभ पाटील फाले, वैभव पाटील कोहर आणि संचित फाले यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. येत्या 24 तासांत शिक्षकाचे निलंबन न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget