एक्स्प्लोर

Ajit Pawar : 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, हट्टीपणा सुरुच आहे; अजितदादांचा शरद पवारांना टोला

Ajit Pawar : "वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही", असा टोला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे.

कल्याण : "वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही", असा टोला  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे. कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबयच असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील 5 वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असेही अजित पवार नमूद केले. 

महापुरुषांच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरु 

शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मिायांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांच्या सणांचा आपण आदर केला पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. कधीही कोणाला वाऱ्यावर सोडायचे नाही. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला. 

महिला धोरणावर काम सुरु; अजित पवारांकडून आदिती तटकरेंचे कौतुक 

सत्तेत राहिलो तरच जनतेची कामे होतात. सध्या मंत्री आदिती तटकरे महिला धोरणावर चांगले काम करत आहेत. मेलो तरी चालेल पण सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. तरुण-तरुणींचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. सर्वसामन्यांचे कल्याण हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यासाठी नवे धरणे बांधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची साथ असली पाहिजे, असे मत अजित पवार यांनी नोंदवले.  

जगात भारताला नरेंद्र मोदींमुळेच प्रतिष्ठा मिळाली

अजित पवारांनी या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचा पाढाच वाचला. "जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी 18-18 तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे."असे अजित म्हणाले. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 वर पोहोचली आहे.  80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.  देशातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही, याची काळजी पीएम मोदी घेत आहेत. शेतकऱ्याला वर्षाला 6 केंद्र सरकारकडून मिळतात. राज्य सरकारकडूनही 6 हजाराची भर टाकली. आता शेतकऱ्याला वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. 

ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही : अजित पवार 

ग्रामीण भागावर होणाऱ्या अन्यायावर अजित पवारांनी भाष्य केले.  शहरी भागाला पाणीपुरवठा करताना ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेत आहोत. वंदे भारत ट्रेन मुंबई ते नाशिक सुरु केली. समृद्धी महामार्ग देखील सुरु केलेला आहे. तरुण -तरुणींच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतोय, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूर दौऱ्यावर, रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत काय भूमिका घेणार? मतदार संघांचे काय आहे महत्त्व?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Nagpur Accident: ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
ई-बाईक खड्ड्यातून उसळली, अंजली थेट दुभाजकावर आदळली; तेवढ्यात मागून येणाऱ्या नागपूर मनपाच्या इलेक्ट्रिक बसनं चिरडलं, जागीच दुदैवी अंत
Abdul Sattar Meet Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंची सत्तारांसमोर एकनाथ शिंदेंबाबत तक्रार; अब्दुल सत्तार म्हणाले, 'मी मित्र म्हणून आलोय', नेमकं काय घडलं?
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget