संगमनेरमध्ये बिबट्या आला, घरात दडी मारुन बसला, दोन तासानंतर वनविभागानं जेरबंद केले
Shirdi News : संगमनेर शहरात (sangamner city) मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला (Leopard, Bibtya) जेरबंद करण्यात यश आले.
Shirdi News : संगमनेर शहरात (sangamner city) मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला (Leopard, Bibtya) जेरबंद करण्यात यश आले. आज सकाळी बिबट्या (Leopard, Bibtya) शहरात आल्याची बातमी आली अन् दहशत माजली होती. अखेर दोन तासांच्या रेक्स्यूनंतर वन विभागाने (MAHARASHTRA FOREST DEPARTMENT) बिबट्याला जेरबंद केले. सुदैवाने या रेस्क्यू ऑपरेशनवेळी कुणालाही दुखापत झाली नाही.
सकाळी सकाळी सात वाजता बिबट्या मुक्तसंचार करत शहरात येतो. नाशिक पुणे महामार्गावरील मालपाणी लोन्सची भिंतीवरून उडी मारत फेरकटका मारत पुन्हा मागच्या भिंतीवरून मालदाड रोड परिसरात जातो. तो पर्यंत बिबट्या शहरात आल्याची चर्चा सुरू होते. त्यानंतर आदर्श नगर मधील एका घरात बिबट्या ठिय्या मांडतो. ही सगळी घटना घडलीय संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत. दोन तासाच्या रेस्क्यूनंतर वनविभागाने या बिबट्याला जेरबंद केले असून सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
संगमनेर शहरात चक्क लोकवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना आज सकाळी घडली. सुरुवातीला नाशिक रोडवरील मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतलेल्या बिबट्याने आपला मोर्चा नंतर मलादाड रोडवरील आदर्श कॉलनीकडे वळवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आदर्श नगर मधील मानकर यांच्या घराच्या मागील बाजूस हा बिबट्या घुसल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने घरात दोन्ही महिलाच होत्या व त्यांनी मागील बाजूचा दरवाजा बंद करत बिबट्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागासह शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. संगमनेर शहरात तब्बल पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या थरारानंतर जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पिंजऱ्यातून मूळ अधिवासात सोडण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले.
बिबट्या शहरात आल्याची वार्ता शहरात पसरताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घरांच्या गच्चीवर असो आणि रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं रेस्क्यु करताना अनेकदा अडथळे निर्माण झाले. अखेर पोलिसांनी नागरिकांना हटवलं. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.