शिर्डीकरांसाठी चांगली बातमी, 19 वर्षानंतर जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू
नवीन दर्शन रांग सुरू झाल्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर जुनी दर्शन रांग हटवून हा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या हस्ते साई भक्तांसाठी नवीन वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण झालं. मात्र गेल्या 19 वर्षांपासून पिंपळवाडी रोडवर असणाऱ्या जुन्या दर्शन रांगेतून साईभक्त साई मंदिरात जात होते. नवीन दर्शन रांग सुरू झाल्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर जुनी दर्शन रांग हटवून हा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शहरातील पिंपळवाडी रोडवर गेल्या 19 वर्षांपासून एका बाजूच्या रस्त्याचा वापर हा दर्शन रांगेसाठी केला जात होत होता. नवीन दर्शन रांग सुरू झाल्यावर हा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. अखेर ती मागणी आता मान्य करण्यात आली असून जुनी दर्शन रांग हटवण्याच काम सुरू झाले आहे. लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल... दरम्यान यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी.
साईबाबा संस्थानचा कारभार उच्च न्यायालयाने नेमलेली त्रीसदस्य समिती पाहत आहे. साईभक्त विरुद्ध ग्रामस्थ सुसंवाद सध्या संपला असून ही समिती बरखास्त करून विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. अनेक नियम मनमानी पद्धतीने केले जात असून शिर्डी ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे विश्वस्त मंडळ कधी स्थापन होणार याकडे शिर्डी ग्रामस्थांसह साई भक्तांचे लक्ष लागलं.
शिर्डी प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या वाकडी गावात चंपाषष्ठी उत्सवाला लाखो भाविकांची हजेरी
शिर्डी जवळील राहता तालुक्यातील वाकडी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान असून या स्थानाला प्रतीजेजुरी म्हणुनही संबोधल जातं. आज चंपाशष्टी निमीत्तान लाखो भाविकांची मांदियाळी खंडोबाच्या दर्शनासाठी दिसून आली. वांगे आणि कांद्याच्या पातीचे भरीत तसेच बाजरीपासून बनवलेला रोडगा नैवेद्य म्हणुन खंडोबाला दिला जातो. वांग तसेच कांद्याची पातं वाहुन त्याचा नवस फेडून आहारात समावेश केला जातो. यळ कोट यळ कोट जय मल्हारच्या जयघोषान खोबर , भंडारा उधळत तळी भरून आरती केली जाते...हजारो गोंधळी येथे जागरण गोंधळ घालतात तर नवविवाहीत दांम्पत्य जागरण गोंधळ घालुन खंडोबाचा आशिर्वाद घेतात.
ज्यावेळी जेजूरीहून खंडोबा महाराज आपल्या सैन्यासह बानूच्या शोधार्थ निघाले, त्यावेळी महाराजांनी याठिकाणी मुक्काम केला. महाराजांच्या सैन्यांना पाणी आणाव यासाठी खंडोबा महाराजांनी प्रधानाला पाठवलं. तेव्हा संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात प्रधानांनी एका घरातून झारिने पाणी आणले. तेव्हा पाणी बानूनेच दिले, हे खंडोबा महाराजांनी ओळखले. खंडोबा महाराजांनी बानूला मी घेऊन यतो असं सांगत सैन्याला येथूनच मागे वळण्याची सुचना दिली, अशी अख्यायिका आहे.