एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो : रामदास आठवले

Shirdi News : प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

Ramdas Athawale On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असे आवाहन रिपाइंचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना केलं आहे. शिर्डी (Shirdi) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे अवाहन केलं आहे,

प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत, मात्र रिपाइं ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये, ते कसे आहेत मला माहित आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्याचबरोर 'महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करतेय सगळ्यांची लूट' असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी मविआचा समाचार घेतला.

कार्यकर्त्यांना आठवलेंचे खडेबोल

अधिवेशनादरम्यान बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करु नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करुन पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन, अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

आठवलेंची चिता करायला आम्ही समर्थ : राधाकृष्ण विखे पाटील 

मध्यंतरी अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी एनडीएमधून बाहेर पडले. मात्र दुसऱ्या बाजूला रामदास आठवले ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. "सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले.. भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले, शिवशक्ती-भिमशक्ती याची ताकत साऱ्यांना दाखवू आणि 2024 ला मविआचा पूर्ण सफाया करु" रामदास आठवले अनेक वर्ष केंद्रात मंत्री आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांची चिंता करु नये, ती चिंता करायला आम्ही समर्थ आहोत असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. 

VIDEO : Ramdas Athawale on Shirdi Loksabha : संधी मिळाल्यास पुन्हा शिर्डीतून लोकसभा लढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Success Story : शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
शाब्बास रं पठ्ठ्या! तीन सख्ख्या भावांची स्पर्धा परीक्षेत यशाला गवसणी! प्रतिकूल परिस्थिती MPSC उत्तीर्ण; उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Shripad Chindam: शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
शिवजयंतीच्या कार्यक्रमावरून श्रीपाद छिंदमांचा ‘यू-टर्न’; बॅनरवरील नाव हटवलं, अहिल्यानगरमध्ये चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
Crime News Sagar Moholkar: गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक
गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Embed widget