Sharad Pawar : शरद पवारांनी आता 'एक मराठा लाख मराठा' घोषणा द्यावी; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला
Sharad Pawar Cast Issue : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा कुणबी जातीचा दाखला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर खुद्द शरद पवार यांनी सांगितले होते की माझी जात सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी आता 'एक मराठा, लाख मराठा' (Ek Maratha Lakh Maratha) अशी घोषणा द्यावी अशी उपरोधिक टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. दिवाळीच्या दरम्यान, पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी सगळ्या देशाला माझ्या जातीबाबत माहित असल्याचे म्हणत अधिक भाष्य केले नाही.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, शरद पवार म्हणाले की, मी कधीच जातीचे राजकारण केलं नाही. माझी जात लोकांना माहिती आहे असेही पवारांनी म्हटले. मात्र, याच गोष्टीवर आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली. शरद पवार यांनी एकदा गर्वाने सांगावे की 'गर्व से हम मराठा' आहे. एकदा घोषणा देऊन टाकावी. एक मराठा लाख मराठा ही घोषणाही द्यावी, म्हणजे तो प्रश्न संपून जाईल असेही विखे-पाटील यांनी म्हटले.
शरद पवारांनी काय म्हटले होते?
काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे." दिवाळी पाडव्याचा (Diwali Padwa) गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.