Sanjay Raut : 'आपण खोटं बोलायचं नाही, खोटं बोलण्याचा मक्ता नरेंद्र मोदींना दिलाय'; संजय राऊतांचा टीकेचा बाण
Sanjay Raut on PM Narendra Modi : राजकारण करतताना आपण खोट बोलायचं नाही, खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिला आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
Sanjay Raut on PM Narendra Modi श्रीगोंदा : राजकारण (Politics) करत असताना आपण खोट बोलायचं नाही, खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिला आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली आहे.
अहमदनगर (Ahmednagar) येथील श्रीगोंदा (Shrigonda) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते (Sajan Pachpute) यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
संजय राऊत म्हणाले की, राजकारणात किती खोटेपणा असावा याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची चोरी आहे. मात्र, राजकारण करत असताना आपण खोट बोलायचं नाही, खोटं बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिला आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला.
आता नकली पाचपुतेंना हटवायचं आणि असली पचपुतेंना आणायचं
ते पुढे म्हणाले की, नकली शिवसेना आणि असली शिवसेना, असे नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राने जागा दाखवून दिली आहे. आता नकली पाचपुते यांना हटवायचं आणि असली पचपुते यांना आणायचे आहे. येथील आमदारांनी काय काम केले, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खासदार निलेश लंके यांनी आता पाणी प्रश्न हाती घेतलेला आहे. हात जोडून काम नाही झालं तर हाथ सोडून काम करावे लागते. हे राज्य गुजरातला आम्ही विकले नाही. मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला घेऊन गेले, पाठीत खंजीर खुपसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे आता विधानसभेतही हीच जादू चालणार आहे. शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेत जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
आणखी वाचा