एक्स्प्लोर

BLO Salary : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, बीएलओंचं मानधन दुप्पट, आता 6000 ऐवजी 12 हजार रुपये मिळणार 

ECI : केंद्रीय निवडणूक आयोगानं बीएलओचं मानधन 6000 रुपयांवरुन 12 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये मतदार यादीची एसआयआर म्हणजेच स्पेशल इंन्टेसिव्ह रिव्हिजन सुरु आहे. या दरम्यान निवडणूक आयोगानं बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच बीएलओच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएलओला पहिल्यांदा 6000 रुपये मानधन मिळायचं ते आता 12000 रुपये दिलं जाणार आहे. याशिवाय बीएलओ सुपरवायझरच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे. 

पहिल्यांदा बीएलओ सुपरवायझरला 12000 रुपये मानधन मिळायचं ते आता 18000 रुपये करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

विविध  राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरु झाल्यानंतर बीएलओच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यो होत्या. काही ठिकाणी कामाच्या ताणामुळं बीएलओंनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव या सह इतर नेत्यांनी बीएलओच्या मृत्यूचा मुद्दा जोरदारपणे मांडत निवडणूक आयोगाला यात लक्ष घालत कारवाई करण्याचं आवाहन केलं होतं. बीएलओंवरील वाढलेल्या कामाच्या दबावाचा मुद्दा पुढं करत निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझरचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बीएलओ मतदारांची मतदार ओळखपत्र तयार करण्याचं काम करतं. निवडणूक आयोगाचा शेवटच्या स्तरावरील प्रतिनिधी म्हणून काम बीएलओ करतात. बीएलओकडे एका बूथची जबाबदारी असते. त्या बूथवर किती मतदार मतदान करतील,त्यांची पडताळणी आणि मतदार कार्डची जबाबदारी बीएलओवर असते. सर्वसाधारणपणे प्राथमिक शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका बीएलओ असतात. 

बीएलओंवरील तणाव गेल्या काही दिवसांमध्ये वाढला आहे. बीएलओचं हे काम अतिरिक्त आहे. ते त्यांची मूळ नोकरी करत असतात. त्यासह त्यांना बीएलओचं काम करावं लागतं. यामुळं बीएलओवरील कामाच तणाव वाढतो. एसआयआरचं काम करत असताना कर्मचाऱ्यांना लोकांच्या अर्जांची पडताळणी करावी लागते. 

विविध राज्यात एसआयआर

दरम्यान,  अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल इथं एसआयआर सुरु आहे. यापूर्वी बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया झाली आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget