(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhakrishna Vikhe Patil: खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार- विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil: मधल्या काळात संजय राऊत हवा पालट करून आलेत, त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी चिंतन केलेलं दिसतंय...मात्र भविष्य काळात त्यांनी विधान करताना विचार करायला हवा असं विखे पाटील म्हणाले.
Radhakrishna Vikhe Patil Latest Marathi News Upadate: खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार आहे, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
राज्यात मागच्या 50 वर्षात एकही पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरु झालं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हंटलं होत याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, खडसे साहेबही मागील काळात मंत्री होते त्यांचीही काही जबाबदारी होती पण ठीक आहे. आगामी काळात खासगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मूळपशुवैद्यकीय विद्यापीठांच्या नियमात बदल करून विनाअनुदानित तत्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ठराविक महाविद्यालये होती मात्र कृषी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यानंतर खासगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालय सुरू झाली त्याच धर्तीवर राज्यातील पशुसंवर्धनांमधील कायद्यामध्ये बदल केला जाणार असून त्यानंतर खासगी तत्वावर पशुसंवर्धन महाविद्यालयांना कुणी परवानगी मागितली तर ती देण्याचा विचार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
आज अहमदनगर येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यासंदर्भातील निवेदनांचा स्वीकार करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.@Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra pic.twitter.com/a8D3XErHMk
— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) December 24, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, आम्ही मुख्यमंत्र्यांबाबतचे पुरावे केंद्र शासनाकडे पाठवलेले आहेत यावर बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या विधानांना किती महत्व देणार आपण, ते नेहमीच बेताल आणि मुक्ताफळे उधळणारी विधान करत राहतात त्यांना आता दुर्लक्षित केलं पाहिजे...राज्यपुढे नवीन नवीन विषय आहेत त्याला प्रसिद्धी देण्याची गरज आहे.
अहमदनगरच्या वाडीया पार्क येथे २७ डिसेंबरपासून भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मैदानाला भेट दिली व स्पर्धेच्या पूर्वतयारीची पाहणी करून आढावा घेतला. 1/2 pic.twitter.com/yvcemBQuMe
— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) December 24, 2022
या सरकारने 40 आमदारांचीही एसआयटी चौकशी लावायला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हंटले होते, त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, मधल्या काळात संजय राऊत हवा पालट करून आलेत, त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी चिंतन केलेलं दिसतंय...मात्र भविष्य काळात त्यांनी विधान करताना विचार करायला हवा असं विखे पाटील म्हणाले.