एक्स्प्लोर

लंकेंना नगरमध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का? अमोल मिटकरींचा सवाल; आता निलेश लंकेंचं चोख उत्तर, म्हणाले...

Nilesh Lanke on Amol Mitkari : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Nilesh Lanke on Amol Mitkari : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी निलेश लंकेंवर जोरदार निशाणा साधला. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मदत केल्यानेच निलेश लंके आभार मानण्यासाठी गजा मारणेकडे गेले असावेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. आता यावर खासदार निलेश लंके यांनी अमोल मिटकरी यांना उत्तर दिले आहे. 

खासदार निलेश लंके यांची कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी भेट झाली त्यानंतर  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान ही भेट केवळ अपघात होता. मला गजा मारण्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिले आहे. 

निलेश लंकेंचं मिटकरींना उत्तर 

तर अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर निलेश लंके म्हणाले की, अमोल मिटकरी यांना काही परिस्थिती माहित आहे का? जरा परिस्थितीची जाणीव करून घ्या. पक्षाने मिडियासमोर बोलण्यासाठी ठेवले आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का?  असा घणाघात त्यांनी केला आहे. 

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही अहमदनगर लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का? गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का? पार्थ पवारांनी मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणीसारखी लंकेंचीही कानउघडणी शरद पवार गट करणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित करत निलेश लंकेंवर निशाणा साधला. 

लंके-मारणे भेटीवर शरद पवार गटाचे स्पष्टीकरण

शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण लंके-मारणे भेटीवर म्हणाल्या की, गजा मारणे गुन्हेगार आहे. याबाबत नीलेश लंके यांना माहिती नव्हती. मी त्यांना ऑफीसकडून संपर्क साधून खुलासा मागितला. यावर त्यांनी सांगितले की, पुण्यात एका पहिलवानाचा मृत्यू झाला. त्यांच्या घरी ते भेट देण्यासाठी गेले होते. तिथं गजा मारणे याने सत्कार केला. मुळात हा व्यक्ती कोण आहे याची महिती लंके यांना नव्हती. त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही असं आश्वासन दिलं आहे. 

आणखी वाचा 

Video: अखेर निलेश लंके इंग्रजीत बोललेच; सुजय विखेंना टोला; शरद पवारांसमोरच तुफान फटकेबाजी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget