(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke : उद्या निलेश लंकेंची उमेदवारी जाहीर होण्याची चर्चा, स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभेसाठी निलेश लंके यांचे नाव उद्या जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nilesh Lanke अहमदनगर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.
निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते गेल्या काही काळापासून निवडणुकीची तयारीदेखील करत आहेत. मात्र भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्याने निलेश लंके नाराज होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवणार, असे बोलले जात आहे.
निलेश लंकेंनी घेतली शिवसैनिकांची भेट
राज्यभरात सर्वत्र तिथीनुसार गुरुवारी शिवजयंती (Shivjayanti 2024) साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिवादन करताना पाहायला मिळत आहे. अहमदनगर येथे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी शहरातील माळीवाडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याबरोबरच शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) वेगवेगळ्या शिवजयंती आयोजनात सहभाग घेऊन शिवसैनिकांच्या भेटी घेतल्यात.
उद्या निलेश लंकेंची उमेदवारी जाहीर होणार का?
दरम्यान महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभेसाठी निलेश लंके यांचे नाव उद्या जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत निलेश लंके यांनी आपल्यालाच याबाबत माहिती नसल्याचे सांगत, आपण याबाबत मविआच्या नेत्यांकडून माहिती घेतो, वक्तव्य केले आहे.
तसा कुणी विचार करत असेल तर ते दुर्दैवी
आज निलेश लंके यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मंडळांना भेटी दिल्याने निलेश लंके हे लवकरच मविआमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगत आहे. याबाबत बोलताना महाराजांच्या जयंतीत कोणत्या पक्षाचा विषय येत नाही. तसा कुणी विचार करत असेल तर ते दुर्दैवी आहे, असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या