एक्स्प्लोर
Latur Flood Updaate लातूरमधील मांजरा नदीकाठचं गौर गाव पुरामुळे उद्धवस्त, बळीराजा हवालदिल
मराठवाड्यातील लातूर (Latur) जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून मांजरा (Manjara) नदीला आलेल्या पुरामुळे गौरगाव गावातील परिस्थिती गंभीर झाली आहे. एका पीडित शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना म्हटले, 'माझं वय बेचाळीस वर्ष आहे, बेचाळीस वर्षात अद्याप असा पाऊस झालेला नव्हता.' या पुरामुळे गावातील जवळपास दोनशे एकर सुपीक शेतजमीन वाळूखाली गेली असून, शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि उसाचे पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. दीड महिन्यात सात वेळा आलेल्या पुरामुळे शेतीचे रूपांतर वाळवंटात झाले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासकीय अधिकारी पंचनामा करून गेले असले, तरी अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. मदत मिळाल्यानंतरही जमीन पुन्हा तयार करण्यासाठी दोन वर्षे लागतील, त्यामुळे 'आता खायचं काय?' असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















