(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News : 'त्या' दोन नेत्यांची नावं शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली, बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar Baramati Agro News : बारामती अॅग्रोवर कारवाई करण्यासाठी राज्यातील दोन बड्या नेत्यांनी आदेश दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) बारामती अॅग्रोवर (Baramati Agro) झालेल्या कारवाईबाबत बोलताना ही कारवाई राजकीय द्वेषापोटी झाल्याचे रोहित पवारांनी म्हटलं होत. यात राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्या दोन नेत्यांचे नावं लवकरच जाहीर करणार असं सांगताना या दोन नेत्यांबाबत आपल्याला शिंदे गटाच्याच एका नेत्याने माहिती दिल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. मात्र जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, वेळ प्रत्येकावर येते असं सूचक विधान रोहित पवारांनी केलंय.
निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले?
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह यासंदर्भात आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. संविधानाला मनामध्ये ठेवून जर निर्णय झाला तर शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल, मात्र संविधानाला धरून निर्णय झाला नाही तर भाजपच्या बाजूने निकाल लागेल असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. मात्र आता सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की निवडणूक आयोग ही भाजपच्या हातातली बाहुली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली. तसेच जेव्हा शिवसेना फुटली आणि शिंदे गटाच्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अन्यायकारक निर्णय दिला, तसाच निर्णय आज दिला निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे हे सिध्द होईल असं रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar On Manoj Jarange : जरांगेंना विरोध करणे योग्य नाही, छगन भुजबळांवर टीका
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, अनेक ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. मात्र त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये यासाठी छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत जरांगे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जर कुणी असा विरोध करत असेल तर ते योग्य नाही. मनोज जरांगे पाटील यांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच त्यांनी अशी शंका व्यक्त केली असावी. मात्र जरांगे यांना विरोध करणे योग्य नाही असं रोहित पवार म्हणाले.
ही बातमी वाचा: