एक्स्प्लोर

Nilesh Lanke : आधी बॅनरवर शरद पवारांचा फोटो, आता कोल्हेंच्या 'महानाट्या'चं आयोजन; लोकसभेच्या उमेदवारीसाठी निलेश लंके हाती 'तुतारी' घेणार? 

Ahmednagar South Lok Sabha Election : राष्ट्रवादी पक्षाचे आमदार निलेश लंके हे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहतील अशी चर्चा नगरमध्ये सुरू आहे. 

अहमदनगर : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी आपले पत्ते खोलायला सुरू केले आहेत. अहमदनगर लोकसभेमध्ये यंदा भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळेच की काय राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात असलेल्या निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) बॅनरवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो दिसत आहे. त्याहीपुढे जाऊन निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याकार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसचेही नेते उपस्थित होते. त्यामुळे निलेश लंके लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. 

सध्या देशात लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत, त्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्हा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अशा दोन विभागात वाटला गेला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे.

सुजय विखेंच्या विरोधात उमेदवारीची चर्चा

राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चेला उधाण आलं असताना महायुतीतच एकत्रित असलेले निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. मात्र निलेश लंके हे अजित पवार गटात असल्याने ते पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत त्यातच आमदार निलेश लंके यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांच्या एका बॅनरवर  शरद पवारांचा देखील फोटो असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभेचे विद्यमान भाजप खासदार सुजय विखे यांच्याकडून येऊ घातलेल्या लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. तर त्यांच्यासमोर नेमकी कोण उमेदवार असणार याची देखील चर्चा रंगू लागली आहे. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. 

निलेश लंकेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो

महायुतीमध्ये हे दोन्ही नेते एकत्रित आहेत, त्यामुळे निलेश लंके पक्ष बदल करणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच त्यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो झळकल्याने या चर्चांना अधिक बळ आले आहे. मात्र आमदार निलेश लंके यांनी या बॅनरबद्दल आपल्याला कल्पना नाही, एखाद्या उत्साही कार्यकर्त्यांने हा बॅनर बनवलेला असावा, त्याबाबत समज दिली जाईल असं म्हटलं आहे.

जागा राष्ट्रवादीला गेली तर लंकेंचा प्रचार करू, सुजय विखेंचे वक्तव्य

बॅनरवरील फोटोबाबत आमदार निलेश लंके यांचे राजकीय विरोधक असणारे आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांना विचारले. त्यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याबाबत मी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणार नाही. लोकसभेसाठी ते जर इच्छुक असतील आणि महायुतीने राष्ट्रवादीला ही जागा दिली तर आमच्या हरकत नाही. आम्ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लढत असून महायुती जो उमेदवार देईल त्यासाठी आम्ही काम करू.

अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचं आयोजन 

दरम्यान, आमदार निलेश लंके यांनी जरी बॅनर बाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी 'आमदार निलेश लंके प्रतिष्ठान'च्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे बॅनरवर शरद पवारांचा फोटो तर दुसरीकडे डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या महानाट्याचे आयोजन, त्यामुळे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात सोबतच शरद पवार गटाचा देखील विचार करत असल्याच बोलल जात आहे.

प्राजक्त तनपुरे लोकसभेसाठी इच्छुक

आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे यांच्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत लढत होण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मात्र पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढू असं म्हटलं आहे.

एकंदरीतच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचे चित्र स्पष्ट होत नाही. मात्र आमदार निलेश लंके हे जरी सावध भूमिका घेत असले तरी देखील ऐनवेळी ते आपली भूमिका बदलून आपले कट्टर राजकीय विरोधक असलेले सुजय विखे यांच्यासमोर उभे ठाकतील असं जाणकार सांगतात. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CWC25 Final: 'टीम इंडिया नक्कीच जिंकेल', चाहत्यांना विश्वास; सेमीफायनलमध्ये Australia ला चारली होती धूळ
Mega Business Hub: BKC पेक्षाही आधुनिक हब, नवी मुंबई, कल्याण, पनवेलचा चेहरामोहरा बदलणार!
Maharashtra Floods: मराठवाड्यातील नुकसानीची 3 नोव्हेंबरला पाहणी होणार, केंद्राचं पथक दाखल होणार
CWC25 Final : टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाला माजी क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी खास शुभेच्छा दिल्या
Maharashtra Rains: भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, ४३ हजार शेतकऱ्यांचे १८ हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
IND vs AUS : अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11
अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget