एक्स्प्लोर

Indurikar Maharaj Mother in Law : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Indurikar Maharaj Mother in law :अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार  यांनी गावच्या विकासासाठी  भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर:  प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई भाजपात प्रवेश केला आहे.  संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या सरपंच असून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.  शशिकला पवार (Shashikala Shivaji Pawar) या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. 

इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार  या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.  शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार  यांनी गावच्या विकासासाठी  भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर थोरात गटाने सुद्धा शशिकला शिवाजी पवार  आमच्या गटात असल्याचा दावा केला होता. मात्र आता भाजप प्रवेशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गावच्या विकासासाठी  भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया

 नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातून शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.  त्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. शशिकला पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई असून गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याच म्हटले होते. दोन्ही नेत्यांनी या अगोदर देखील सहकार्य केले आहे. या पुढेही दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मात्र थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचे शशिकला पवार यांनी म्हटले आहे.  

थोरातांना मोठा धक्का 

निळवंडे गाव हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील असून शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत थोरात गटाने जिंकल्या असल्या तरी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तळेगाव दिघे, घुलेवाडी यासह आता निळवंडे ग्रामपंचायतीवर विखे यांनी सत्ता मिळवली आहे,

कोण आहेत इंदोरीकर महाराज? ( Who is Indurikar Maharaj? ) 

इंदोरीकर महाराज हे प्रसिद्ध किर्तनकार आहे. इंदोरीकर महाराज त्यांच्या मिश्लिक अंदाजातील किर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Embed widget