एक्स्प्लोर

Nashik News : 20 हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार ताब्यात, महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : कोपरगाव (Kopargaon) येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे.

Nashik News : लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाकडून (Nashik ACB) धडक कारवाया सुरुच असून नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात कारवाईची धडक मोहीम सुरूच आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) येथील तहसीलदारास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील ही घटना असल्याने खळबळ उडाली आहे. 

एकीकडे महसूल मंत्री विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी नुकतेच अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात राज्यातील वाळू डेपो सुरु करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना एक ब्रास वाळू सहाशे रुपयांत मिळत आहे. मात्र दुसरीकडे अद्यापही वाळू तस्करी जोरात सुरु असल्याचे या घटनेवरुन अधोरेखित झाले आहे. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (Vijay Borude) यांना 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतलं आहे. वाळूची गाडी सोडण्यासाठी एका खाजगी पंटरमार्फत ही लाच स्वीकारत असताना बोरुडे यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. एकीकडे महसूलमंत्री नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून वाळू तस्करीला लगाम लावण्याचा दावा करत असताना त्यांच्याच जिल्ह्यात तहसीलदार वाळू तस्करांकडून कारवाई टाळण्यासाठी हप्ते घेत असल्याचं उघड झालं आहे. 

तहसीलदाराला पंटरसह बेड्या

यातील तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून वाळू वाहतुकीच्या गाडीवर कारवाई न करण्याकरता लाच घेणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदारासह पंटरला शनिवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारावर कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडून देण्यासाठी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी 20 हजारांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम पंटरकडे देण्यास सांगितले. दरम्यान एसीबीने सापळा रचून खासगी इसम गुरमितसिंग दडियल याला 20 हजारांची लाच स्वीकारताना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

सापळा रचला आणि दोघे अडकले 

याबाबत 17 मे रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली. लाच  मागितल्याचे निष्पत्र झाल्यानंतर एसीबीने शनिवारी कोपरगांव तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात बोरुडे आणि दडियल अडकले. 20 हजारांची लाच घेताना बोरूडे आणि दडियाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कोणत्याही अधिकाऱ्याने कसल्याही कामासाठी लाच मागितल्यास त्याची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे करावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget