Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉसच्या घरात पुन्हा घमासान, प्रणित तान्या अन् फरहानाला भिडला; बाचाबाची बघून चाहते म्हणाले ....
इतके दिवस संघर्ष आणि वादळ टाळण्याच्या प्रयत्नात असलेला प्रणित बिग बॉसच्या घरात ऍक्टिव्ह झाला आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तो आणि तान्या वाद घालताना दिसतायत.

Bigg Boss 19: बिग बॉस 19चा सिझन शेवटच्या टप्प्यात गेल्याने घरात स्पर्धकांचा ड्रामा पुन्हा सुरू झालाय. शेवटच्या काही दिवसात प्रत्येकाला आपापला गेम स्ट्रॉंग करायचा आहे. त्याच्याच प्रयत्नात सगळेजण असल्याचे दिसतात.घरात सध्या तिकीट टू फिनाले टास्क सुरू आहे .या आठवड्यात घरातून एका स्पर्धकाला बाहेर काढले जाईल.अंतिम फेरी जवळ येत असताना बिग बॉसच्या स्पर्धकांमधील समीकरणे बदलत आहेत. स्टँड अप कॉमिक प्रणित मोरे (Pranit More) याचा एक प्रोमो सध्या कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. यात तान्या मित्तल आणि प्रणित मोरे एकमेकांशी भिडले आहेत. इतके दिवस संघर्ष आणि वादळ टाळण्याच्या प्रयत्नात असलेला प्रणित बिग बॉसच्या घरात ऍक्टिव्ह झाला आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तो आणि तान्या वाद घालताना दिसतायत.
नेमकं काय आहे प्रोमोमध्ये?
बिग बॉसची अंतिम फेरी जवळ येत असताना प्रणित मोरे आणि तानिया मित्तल एकमेकांना भिडले आहेत. शोचा एक नवीन प्रोमो सुरूवाला असून त्यात तान्या आणि प्रणित एकमेकांशी वाद घालताना दिसतात. तान्या आणि प्रणितमध्ये फरहानामध्ये पडते ती तान्याची बाजू घेण्यासाठी. फरहानाही प्रणितला उत्तर देते. त्यामुळे वाद आणखी वाढतो.
तान्या प्रणितला म्हणताना दिसते " मी तुझ्याशी बोलतेय हे तुझं भाग्य आहे असं समज" त्यावर प्रणितही उत्तर देतो की " मी फक्त तुझ्याशी बोलायला शोमध्ये आलो होतो! यावर ठाण्याला सपोर्ट करण्यासाठी फरहाना मध्ये बोलते " तान्या, तू हात उचलू शकतेस का? त्यावर प्रणित फरहानाला म्हणतो " आली सपोर्टर .. ब्लूटूथ डिवाइस कनेक्ट झालं .. ' प्रणितच्या अशा बोलण्यावर तान्या हे काय करतोयस ... अजिबात चांगलं वाटत नाहीये असं म्हणते. यावर प्रणित म्हणतो, " तू रोज हे ढोंगीपणा करतेस हे तुला चांगलं वाटतं का ? " यावर माणसासारखं तोंड घेऊन बोल असं फरहाना बोलते. त्यावर लगेच प्रणित तु तुझं तोंड कधी आरशात पाहिलेस का? तुला मेकअप करून यावं लागतं इथे .. असं म्हणताना दिसतोय. दुसरीकडून तान्या तुझ्यासारख्या व्यक्तीला उत्तर द्यावं लागतंय. या घरात तुझा काहीही उपयोग नसल्याचं म्हणत तान्या चिडते. त्यावर प्रणित हसताना दिसतो.
View this post on Instagram
चाहते काय म्हणाले?
या प्रमुख खाली चाहत्यांनी प्रणितच्या गेमचं कौतुक केलंय. काहींनी या वादावर प्रणितने तान्या आणि फरहानाला दिलेले उत्तर, प्रतिहल्ले चाहत्यांना आवडले आहेत. अंतिम सामना जवळ येताच प्रणितने आपला गेम सुधारला असं म्हणत चाहत्यांनी प्रणितचे कौतुक केले आहे. एकाच्या हाताने लिहिले प्रणितने धो डाला अच्छे से .. तर एकाने लिहिलंय प्रणित बी लाईक वन मॅन आर्मी .. अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.























