एक्स्प्लोर

भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर! नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच जोरदार राडा

Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

शिर्डी : अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी (Pathardi Shevgaon Constituency) भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला होता. या पाठोपाठ आता काँग्रेस (Congress) पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात गोंधळ उडाल्याने खळबळ उडाली. 

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. 

काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती सुरु असताना दोन्ही गटात गोंधळ उडाला. यामुळे काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आ. मुज्जफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याविरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर

दरम्यान, 1 ऑक्टोबरला पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरे दारात पोहोचताच प्रसिद्ध गायिकेनं नजर काढून बोटं मोडली, औक्षण करत जोरदार स्वागत

नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

व्हिडीओ

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
Embed widget