Bakri Eid 2023 : बकरी ईदसाठी बोकड बाजारात लाखोंची उलाढाल, पाच हजारांपासून ते 30 हजारापर्यंत बोकडाला मागणी
Bakri Eid 2023 : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात बकरे विक्रीसाठी आलेले होते. कुर्बानीसाठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी - विक्रीतून लाखों रुपयांची उलाढाल नांदगाव बाजार समितीत झाली.
नांदगाव : येत्या 29 तारखेला मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण असल्याने इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव हे ' बकरी ईद ' सणाच्या निमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देतात.या कुर्बानीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होत मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी - विक्री झाली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात बकरे विक्रीसाठी आलेले होते.कुर्बानीसाठी घेण्यात आलेल्या बोकड खरेदी - विक्रीतून लाखों रुपयांची उलाढाल नांदगाव बाजार समितीत झाली. पाच हजार रुपयांपासून ते 40 हजार रुपये किंमतीच्या बोकडांची मागणी आज बाजारात होती. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते.त्यानुसार या दिवशी कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाह साठी कुर्बानी द्यावी लागते.
एका इस्लामिक मान्यतेनुसार बकरा कुर्बान करण्याची प्रथा पडली आहे.कुर्बान केलेल्या बोकडाच्या मासांचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्मियांच्या घरात किंवा गरजवंताला देण्याची प्रथा आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात मुस्लीम समाजाने घेतला कुर्बानी न करण्याचा निर्णय
अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. तर 29 जूनला आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरम्यान याच दिवशी मुस्लीम समजाचा बकरी ईदचं देखील सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सद्याची राज्यातील परिस्थिती पाहता एकाच दिवशी येणारे हे दोन्ही सण शांतेत साजरे करण्यात यावेत असा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या वाळूज पोलिसांनी वाळूज भागातील पंढरपूर येथे असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शांतता समितीची बैठक बोलावली होती. यावेळी झालेल्या बैठकीत बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुस्लीम समाजाकडून घेण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचं देखील या बैठकीत निर्णय झाला.
बकरी ईद निमित्ताने सुरक्षा बैठक
येत्या काही दिवसात बकरी ईद सण साजरा केला जाणार आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्याबाबत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित असणार होते. यावेळी बकरी ईदनिमित्ताने करावयाच्या सुरक्षा योजनांवर चर्चा झाली.