एक्स्प्लोर

Ashok Kharat : अशोक खरातचा 'स्पेशल 26' पॅटर्न, आपल्याच भक्तांवर बोगस आयकर अधिकाऱ्यांकडून छापेमारी करायचा, तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळायचा

Ashok Kharat Crime Case : श्रीमंत असलेल्या व्यावसायिक आणि उद्योगपतींवर अशोक खरातचे बोगस आयकर अधिकारी छापेमारी करायचे. नंतर अशोक खरात या प्रकरणात तडजोड करायचा अशी माहिती समोर आली आहे.

नाशिक : आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणाऱ्या अशोक खरातचा (Ashok Kharat) आणखी एक प्रताप समोर आला आहे. बॉलिवूड चित्रपट 'स्पेशल 26' पॅटर्नप्रमाणे अशोक खरात हा आपल्याच श्रीमंत भक्तांकडे बोगस आयकर अधिकारी (Fake Income Tax Officers) पाठवायचा आणि त्यांना लुटायचा अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले लोक समोर येऊन तक्रार करणार का याकडे लक्ष आहे. 

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अशोक खरातवर आर्थिक फसवणुकीचे आरोपही करण्यात आले आहेत. या प्रकरणी एसआयटी तपास सुरू असून त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. 

हिंदी सिनेमासारखा अशोक खरात याचा 'स्पेशल 26' पॅटर्न चर्चेत आला आहे. अशोक खरात हा त्याचे भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजक हेरायचा. त्यानंतर त्यांच्याकडे बोगस आयकर अधिकारी पाठवायचा आणि त्यांना भीती घालायचा. नंतर तडजोड करण्याच्या नावाखाली तो भक्तांकडून मोठी रक्कम उकळायचा अशी माहिती समोर आली आहे.

आपल्याच भक्तांना नकली आयकर अधिकारी पाठवून त्यांना गंडा घातल्याचा प्रकार अशोक खरातने केला आहे. यानंतर आता फसवणूक झालेले भक्त तक्रार देण्यासाठी समोर येतात का ते पाहावं लागेल.

Vikas Diwate Case : विकास दिवटे प्रकरणाचा पुन्हा तपास

सन 2022 मधील एका प्रकरणात भोंदू खरातच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये शिर्डी संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी त्यांचं जीवन संपवलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव सादर केला. या प्रकरणाच्या फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचं चार्जशीटमधून नाव वगळण्यात आलं होतं. 

मृत विलास दिवटे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलीस अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास होण्याची चिन्हं आहेत. सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहेत. 

खरातविरोधात तक्रारींचा आकडा वाढला

अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर महिला आणि फसवणूक झालेल्याचा तक्रारीचा ओघ सुरूच आहे. लैंगिक छळ आणि बळकावलेल्या प्रॉपर्टीविरोधात तक्रारी येत आहेत. महिला अत्याचाराच्या तक्रारीचा आकडा वाढला असून आणखी 11 महिलांनी पुढे येत खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 

पतीच्या, मुलांच्या किंवा कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या सर्व तक्रारींची शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे.  भोंदू अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी महिला अत्याचाराचे 8 तर फसवणुकीचे 4 गुन्हे आहेत. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget