एक्स्प्लोर

श्रीगोंद्यातील प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली, 'या' मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!

Shrigonda Vidhan Sabha Constituency : अहमदनगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून मातब्बर नेत्याने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha Constituency) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार (Annasaheb Shelar) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे येथील प्रस्थापितांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. 

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीचे अण्णासाहेब शेलार यांनी आतापर्यंत श्रीगोंद्यातील विद्यमान भाजप आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute), माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar), अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांना नेहमीच राजकारणात मदत केली आहे. 

आता सर्वांनी मला साथ द्यावी

अनेकांच्या आमदारकीच्या निवडणुकीत शेलार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मात्र आता थेट अण्णासाहेब शेलार यांनीच निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे समीकरणे बदलणार आहेत. या आधी मी त्याग करून सर्वांना मदत करत आमदार केले, आता सर्वांनी मला साथ द्यावी, अशी भूमिका शेलारांनी व्यक्त केलीये. 

आमचा पक्ष ठरलाय, पण...

दरम्यान, मधल्या काळात अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार हे विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत विचारले असता आम्ही बाप-लेक चर्चा करू आणि जनतेचा देखील विचार घेऊ, मगच निर्णय घेऊ असे शेलार यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आमदार केले, आता आमचा पक्ष ठरला आहे. पण, लगेच त्याबाबत सांगणार नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे. 

शरद पवार गटाकडून अकोलेतून अमित भांगरेंना उमेदवारी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित भांगरे (Amit Bhangre) यांच्या पाठीशी उभे राहा, या ठिकाणचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) यांना खाली बसवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोलेतील शेतकरी मेळाव्यामध्ये केले होते. त्यामुळे अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे विरुद्ध किरण लहामटे, अशी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

रोहित पाटलांनंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरूण उमेदवार जाहीर, राष्ट्रवादीचे तीन उमेदवार ठरले

मोठी बातमी : विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, जागावाटपाआधीच मोठी घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
INDIA Alliance Morcha on Election Commission: इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले, "होय मी हिंदू, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही"
Dadar Kabutar Khana Mangalprabhat Lodha: जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया,  म्हणाले...
जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
INDIA Alliance Morcha on Election Commission: इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले, "होय मी हिंदू, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही"
Dadar Kabutar Khana Mangalprabhat Lodha: जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया,  म्हणाले...
जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाले...
INDIA Alliance March on Election Commission: मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
INDIA Alliance March on Election Commission: राहुल गांधींनी 'मतचोरी'वरून घेरलं, इंडिया आघाडीचा आज गल्ली ते दिल्ली एल्गार; तिकडं निवडणूक आयोगाने सुद्धा नोटीस धाडताना सेम टायमिंग साधली!
राहुल गांधींनी 'मतचोरी'वरून घेरलं, इंडिया आघाडीचा आज गल्ली ते दिल्ली एल्गार; तिकडं निवडणूक आयोगाने सुद्धा नोटीस धाडताना सेम टायमिंग साधली!
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत एल्गार; मनोज जरांगे यांचं आवाहन, धाराशिवमध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांचे बुकिंग
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी धाराशिवमध्ये आतापर्यंत 10 हजार गाड्यांच बुकिंग; मनोज जरांगे यांचं आवाहन; 29 ऑगस्टला मुंबईत पुन्हा एल्गार
Babanrao Taywade : ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट,  मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; बबनराव तायवाडे यांचे थेट आव्हाने, म्हणाले...
मुंबईतील 29 ऑगस्टच्या मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; बबनराव तायवाडे यांचे थेट आव्हान, म्हणाले...
Embed widget