INDIA Alliance March on Election Commission: मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
INDIA Alliance March on Election Commission: इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला.

INDIA Alliance March on Election Commission: इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये 'सेव्ह व्होट'चे बॅनर घेतले आहेत. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 300 विरोधी खासदारांनी दिल्लीत पायी मोर्चा काढला आहे. ते संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत जातील. दुसरीकडे, या खासदारांना बाहेर रोखण्याची तयारी आहे.
#WATCH | Delhi Police stops INDIA bloc leaders marching from the Parliament to the Election Commission of India to protest against the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in poll-bound Bihar and allegations of "voter fraud" during the 2024 Lok Sabha elections. pic.twitter.com/4KcXEALWxY
— ANI (@ANI) August 11, 2025
शिष्टमंडळ नव्हे तर एकत्रितपणे निवेदन सादर करावे
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 16 वा दिवस आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी गोंधळ सुरू केला. खासदारांनी 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा देत सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, निवडणूक आयोगाला ही आमची मूलभूत विनंती आहे. विरोधी खासदारांनी केवळ शिष्टमंडळ नव्हे तर एकत्रितपणे निवेदन सादर करावे.
#WATCH | Delhi: INDIA bloc leaders begin their march from the Parliament to the Election Commission of India to protest against the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in poll-bound Bihar and allegations of "voter fraud" during the 2024 Lok Sabha elections. pic.twitter.com/ONQhHLfGBe
— ANI (@ANI) August 11, 2025
राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातला
राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधकांनी घोषणाबाजी केली. खासदार 'मतचोरी थांबवा' अशा घोषणा देत सभापतींच्या खुर्च्याजवळ पोहोचले. त्यानंतर कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास, विरोधकांनी गोंधळ घातला
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना विरोधकांनी 'आम्हाला न्याय हवा आहे' अशा घोषणा दिल्या.
#WATCH | Delhi Police stops INDIA bloc leaders marching from the Parliament to the Election Commission of India to protest against the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in poll-bound Bihar and allegations of "voter fraud" during the 2024 Lok Sabha elections. pic.twitter.com/B3yuiL0fJz
— ANI (@ANI) August 11, 2025
आतापर्यंत 15 दिवसांत 2 दिवस चर्चा झाली
21 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले आहे. बिहारमध्ये मतदार पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी दररोज निषेध केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























