एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो : रामदास आठवले

Shirdi News : प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे.

Ramdas Athawale On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असे आवाहन रिपाइंचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना केलं आहे. शिर्डी (Shirdi) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे अवाहन केलं आहे,

प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत, मात्र रिपाइं ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये, ते कसे आहेत मला माहित आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्याचबरोर 'महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करतेय सगळ्यांची लूट' असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी मविआचा समाचार घेतला.

कार्यकर्त्यांना आठवलेंचे खडेबोल

अधिवेशनादरम्यान बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करु नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करुन पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन, अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

आठवलेंची चिता करायला आम्ही समर्थ : राधाकृष्ण विखे पाटील 

मध्यंतरी अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी एनडीएमधून बाहेर पडले. मात्र दुसऱ्या बाजूला रामदास आठवले ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. "सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले.. भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले, शिवशक्ती-भिमशक्ती याची ताकत साऱ्यांना दाखवू आणि 2024 ला मविआचा पूर्ण सफाया करु" रामदास आठवले अनेक वर्ष केंद्रात मंत्री आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांची चिंता करु नये, ती चिंता करायला आम्ही समर्थ आहोत असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. 

VIDEO : Ramdas Athawale on Shirdi Loksabha : संधी मिळाल्यास पुन्हा शिर्डीतून लोकसभा लढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

OBC Reservation Row: '...नाहीतर मग निवडणुका आहेत तर समोर', Vijay Wadettiwar यांचा सरकारला थेट इशारा
OBC Reservation Protest: 'Bhujbal साहेबांचे काही संभ्रम आहेत', Chandrashekhar Bawankule यांचे वक्तव्य
OBC Quota Row: 'पुढची राजकीय दिशा ठरू शकते', Beed च्या महाएल्गार सभेत Dhananjay Munde यांच्या भूमिकेकडे लक्ष
Navi Mumbai Diwali Market : ‘चायनीज मालावर बहिष्कार टाका!’, ग्राहकांची मागणी; पण वाढलेल्या दरांचं काय?
Ravindra Chavan on Sanjay Raut : राऊतांवर बोलण्यासाठी राजकारणात नाही; चव्हाणांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajirao Kardile: तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
तब्येत नाजूक, पण लोकांमध्ये मिसळण्याची आस शेवटपर्यंत कायम; निधनाच्या आदल्या दिवशीचा शिवाजीराव कर्डिलेंचा अंतःकरणाला स्पर्श करणारा क्षण
Digital Arrest : वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्ट, 58 कोटींना लुटलं; सायबर सेलचे यशस्वी यादव काय म्हणाले?
Ola Shakti Electric battery: ओला इलेक्ट्रिकची एक घोषणा अन् शेअरमध्ये जोरदार तेजी, ओला शक्ती लाँच, बॅटरीवर एसी, फ्रीज सुरु राहणार
ओला इलेक्ट्रिकचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ओला शक्तीबाबत कंपनीची मोठी घोषणा, स्टॉकमध्ये तेजी सुरु
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी येणार,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा जोरदार तेजी,चांदी सव्वा दोन लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता
Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Kolhapur News: कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Ashish Shelar VIDEO: शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
Embed widget