![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
थोरातांचीही लेक विधानसभेच्या मैदानात?; प्रणिती शिंदेच्या वक्तव्याने संगमनेरकरांच्या भुवया उंचावल्या
Praniti Shinde : पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या समोरच केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
![थोरातांचीही लेक विधानसभेच्या मैदानात?; प्रणिती शिंदेच्या वक्तव्याने संगमनेरकरांच्या भुवया उंचावल्या Praniti Shinde taunts Mahayuti government over Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana at Indira Mahotsav Balasaheb Thorat Jayashree Thorat Sangamner Maharashtra Marathi News थोरातांचीही लेक विधानसभेच्या मैदानात?; प्रणिती शिंदेच्या वक्तव्याने संगमनेरकरांच्या भुवया उंचावल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/03/5ec5dffbe0d2fd980ee59b7b7c57c6491725355565699923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
संगमनेर : पुढची निवडणूक जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांनी लढावी, असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या समोरच केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. संगमनेर (Sangamner) येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वात इंदिरा महोत्सव घेण्यात आला. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, बाळासाहेब थोरात यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं. सोलापूर माझं गाव असलं तरी संगमनेर माझ्यासाठी घरच आहे. मी आमदार, खासदार झाले मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम मी सुद्धा करू शकले नाही. गृहिणी खूप हुशार आहेत. मात्र त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभे राहिले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं, असे त्यांनी म्हटले आहे.
...तर अत्याचार कमी झाल्याशिवाय राहणार नाही
त्या पुढे म्हणाल्या की, महिला आपल्या ताकदीचा वापर कमी करतात. महिलांमध्ये दैवी शक्ती असते. म्हणून त्या बाळाला जन्म देतात. मात्र अन्याय झाला तर आपण आपल्या शक्तीचा वापर करत नाही. ज्यावेळी बालकांवर अत्याचार होतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते. महिलांच्या प्रश्नाविषयी संसदेत देखील महिलाच बोलतात. हे बदलण्याची आज गरज आहे. आपण देखील मुलींना घरी सल्ले देतो. मुलांना काही सांगत नाही. मुलांना देखील समजावून सांगा. हे बदललं तर अत्याचार कमी झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो. आता मुलींना देखील त्याच्या बरोबर उभं करा, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सत्ताधारी आरोपींना पाठीशी घालतात
मी सोळा वर्षापासून राजकारणात आहे. महिलांमध्ये मोठी ताकद आहे ती व्यर्थ घालवू नका. काँग्रेसच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार कमी होते. मात्र आता विकृत मानसिकता वाढत चालली. कारण सत्ताधारी आरोपींना पाठीशी घालतात. हे महिलांकडे वस्तू म्हणून बघतात. म्हणून अत्याचार वाढत चालले आहेत, अशी टीका महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून प्रणिती शिंदे यांनी सरकारवर केली आहे.
म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत
तर लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलंय की, लाडकी बहीण उद्या सावत्र होईल याची खात्री नाही. म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत. नवरा सगळा पगार देतो, त्याचं एकत नाही तर यांचे कोण ऐकणार? असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला.
पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी
प्रवास करताना आम्हालाच खासदार असून सुरक्षित वाटत नाही तर सामान्य महिलांचे काय? महिलांवर आत्यचार झाले तर मातृभूमीच्या डोळ्यात देखील अश्रू येतात. महिला म्हणून जन्माला येणं हीच मोठी जबाबदारी आहे. सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण दिले. मात्र 50 टक्क्यांसाठी आपण भांडतो. हे विकृत लोक ते मंजूर करत नाही. राजीव गांधींनी सोनिया गांधीचे ऐकले नाही आणि त्यादिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली. परिस्थितीवर मात करून सोनिया गांधी पुढे आल्या. त्यांच्यामुळे आज आमच्या सारख्या महिला पुढे आल्या, असे म्हणत पुढची निवडणूक जयश्री थोरात यांनी लढावी, अशी मागणीच प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
वय कितीही असलं तरी दिसलं न पाहिजे, दिलीप मानेंच्या वाढदिवस सोहळ्यात प्रणिती शिंदेंचं वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)