राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?
Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी मंत्र्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले आहे. दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत असून आता अहमदनगरच्या (Ahmednagar News) राहुरी विधानसभा मतदारसंघातून (Rahuri Assembly Constituency) भाजपच्या (BJP) माजी मंत्र्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
आगामी विधानसभा निवडणुक ही आपण राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याचे भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून शिवाजी कर्डिले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Elections 2024) लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती.
राहुरीतूनच निवडणूक लढवणार : शिवाजी कर्डिले
त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता शिवाजी कर्डिले यांनी आपण राहुरीतुनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले आहे.
2019 सालचा वचपा काढण्यासाठी सज्ज
2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून हर्षदा काकडे इच्छुक
अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये (Shevgaon Pathardi Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे.
आणखी वाचा