एक्स्प्लोर

Supriya Sule : भारतीय जनता पार्टी म्हणते 'बेटी बचाव, बेटी पढाव', मात्र मुंडे भगिनींची काय अवस्था करून ठेवलीय, सुप्रिया सुळेंचा सवाल 

Ahmednagar News : भारतीय जनता पार्टी म्हणते 'बेटी बचाव बेटी पढाव' मात्र दुसरीकडे मुंडे भगिनींची अवस्था बिकट करून ठेवली आहे.

अहमदनगर  : 1995 साली जेव्हा भाजपची (BJP) सत्ता आली, त्यावेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि प्रमोद महाजन (Praod Mahajan) यांनी काँग्रेस विरोधात रान पेटवलं होतं. त्यांनी भाजपला मोठं केलं, मात्र त्याच कुटुंबातील मुंडे भगिनींची भाजपनं काय अवस्था करून ठेवली आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे. शिवाय एकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणते 'बेटी बचाव बेटी पढाव' मात्र दुसरीकडे भाजपामधीलच मुंडे भगिनींना दुय्यम स्थान देण्याचं काम भाजपकडून होत असल्याची टीकाही सुळे यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यावर असताना पाथर्डी येथे राष्ट्रवादीच्या परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सुळे यावेळी म्हणाल्या की, पंकजा मुंडे (Pankja Munde) या अनेक वेळेला ऊसतोड मजुरांच्या प्रश्नासंदर्भामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला यायच्या. त्यावेळी आम्ही कधीही त्यामध्ये राजकारण आणलं नाही.  मात्र निवडणुकीच्या वेळेला नक्कीच टोकाचा संघर्ष केला. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत पंकजा मुंडे आल्यानंतर त्यांचा सन्मानच केला गेला आणि भविष्यातही करू असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) या दोघीही बहिणी लढाऊ आहेत, मात्र सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी म्हणते, बेटी बचाव बेटी पढाव मात्र दुसरीकडे मुंडे भगिनींची अवस्था बिकट करून ठेवली आहे. यावेळी ऊसतोड मजुरांचा प्रश्न काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला, त्याला उत्तर देताना पंकजा मुंडे ऊसतोड मजुरांसाठी नेहमीच संघर्ष करतात, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुरुवातीच्या मुंडे कुटुंबियांमधील गोपीनाथ मुंडे भाजप पक्ष वाढविण्यासाठी जीवाचं रान केलं. घराघरात जाऊन भाजप पक्ष पोहचवला. 1995 साली जेव्हा भाजपची सत्ता आली, त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी काँग्रेस विरोधात रान पेटवलं होतं. त्यांनी भाजपला मोठं केलं, त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजपाला बळकटी देण्याचे काम केले. त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेला तरी देखील त्या संघर्ष करत आहेत. याबाबत त्यांचं कौतुक करावं तितके कमी आहे.  मात्र त्याच कुटुंबातील मुंडे भगिनीं आज भाजपच्या प्रेमापासून वंचित असल्याचे दिसते आहे. 

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनेचा संप

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटनेनं संप पुकारला आहे. ऊसतोड मजुरांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे. दरवाढीच्या मागण्याविषयी 30 सप्टेंबरला पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या ऊसतोडणी मजुरांना 273 रुपये प्रति टन दर मिळत असून हार्वेस्टरला 400 प्रतिटन दर मिळत आहे, मात्र ऊसतोडणी मजूरांना हार्वेस्टरच्या दराप्रमाणे 400 रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी मजुरांची आहे. ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून येत्या काळात साखर संघ आणि मुंडे यांच्यात संघर्ष होणार असल्याचं मानलं जात आहे. महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्यानं चालू हंगामात संप करण्याचं निर्णय घेण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Supriya Sule : जेव्हा तुम्ही यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावता, तेव्हा भाजपसोबत दोस्ती करता येणार नाही... नाशिकच्या पोस्टरवरून सुप्रिया सुळे यांचा टोला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget