एक्स्प्लोर

मंगलअष्टका नव्हे... तर शिवरायांची आरती आणि स्फूर्ती गीते लावून पार पडला विवाह, अहमदनगरमधील लग्नाची सर्वत्र चर्चा

Ahmednagar Marriage News: महाराष्ट्राला ज्यांनी प्रेरणा दिली त्या शिवरायांचा विचार वऱ्हाडी मंडळीपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आणि त्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

अहमदनगर: लग्न म्हटलं की वेगवेगळ्या धार्मिक प्रथा परंपरा आल्या. हिंदू धर्मात लग्न सोहळ्यात वेगवेगळ्या पूजाविधी, मंगलअष्टक यांना विशेष महत्व असतं. मात्र अहमदनगरमध्ये एका लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे लग्न मंगलअष्टकांशिवाय पार पडलं. मंगलअष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून आणि त्यांची स्फूर्ती गीते लावून हा लग्न सोहळा पार पडला. अहमदनगरच्या थोरात आणि धिसले परिवारातील योगिनी आणि विकास यांच्या विवाहसोहळ्यात मंगलअष्टका म्हटली गेली नाहीत. 

आपले लग्न हे आठवणीत राहावे म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे लग्न सोहळा करत असतात. कुणी हवेत लग्न करतो तर कुणी पाण्यात लग्न करतो. मात्र योगिनी आणि विकास यांनी आपला विवाह सोहळा हटक्या पद्धतीने पार पाडला. केवळ आठवणीत राहण्यासाठी नाही तर या विवाह सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे असलेले आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्व आलेल्या वऱ्हाडी मंडळींपर्यंत पोहचावे हा त्यांचा हेतू. यासाठी त्यांनी मंगल अष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करत लग्न सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सत्कारावर होणाऱ्या खर्चाला फाटा देत त्यांनी तो खर्च शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना दान म्हणून दिला. 

योगिनी या अहमदनगर शहरातील गोरक्षनाथ थोरात यांच्या कन्या आहेत. गोरक्षनाथ थोरात हे हे रयत बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत तर गृहिणी असलेली त्यांची पत्नी शैला थोरात या धार्मिक वृत्तीच्या. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांची एक मुलगी शिक्षिका आहे तर मुलगा अभिषेक थोरात हा इंजिनियर झाल्यानंतर एका अमेरिकन कंपनीत नोकरीला लागला. ज्या मुलीचंआज लग्न झालं ती योगिनी थोरात ही एमसीएसची पदवी घेऊन पुण्यात एका कंपनीत नोकरी करते. 

करमाळा येथील नवरा मुलगा विकास किसन धिसले हा बीटेक आणि एमबीए पदवी घेऊन उच्चपदस्थ कंपनीत पुणे येथे जॉब करत आहे. दोन्ही कुटुंबं उच्चशिक्षित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी प्रेरणा या महाराष्ट्राला दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरात कुटुंब हे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळे हे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने आणि स्फूर्तीने व्हावे अशी दोन्ही कुटुंबियांची इच्छा होती. त्यानुसार हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्याची शहरातच नाही तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRahul Gandhi Diwali : प्रियांका गांधींचा मुलगा रेहानसह राहुल गांधींची दिवाळीABP Majha Headlines :  5  PM :  1 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Urf Bullet Patil Exclusive  : पोलिस खात्यातून राजकारणात कसे आले बुलेट पाटील ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Mallikarjun Kharge : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बोलून गेले, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जागेवर खवळले! म्हणाले, 'आम्ही तिकडं महाराष्ट्रासाठी....'
Girish Mahajan : एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
एकनाथ खडसे म्हणतात, विजयाचे फटाके मविआच फोडणार, कट्टर विरोधक गिरीश महाजनांनी डिवचलं, म्हणाले...
Daund Assembly constituency: '4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
'4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण...', दौंडची जागा मिळवण्यासाठी अजित पवार पक्षाचे नेते आग्रही
Spain Rain :  स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये फक्त 8 तासात एक वर्षांचा पाऊस कोसळला; पूल, गाड्या वाहून गेल्या, महापुरात 50 वर्षांचा विक्रम मोडला, 158 जणांचा मृत्यू
Embed widget