कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या,पीडित तरुणीच्या नातेवाईकाने नग्न करुन रात्रभर बसवले स्मशानभूमीत
Kopardi: सुसाईड नोटमध्ये स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बबन बुद्रिक हा कोपर्डीतील निर्भयचा नातेवाईक आहे.
अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार (Kopardi) आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोपर्डीच्या पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गावात नग्न करून मारहाण आणि शिवीगाळ करत स्मशानभूमीत बसवले. या प्रकारामुळे अपमानीत झाल्याच्या भावनेतून तरुणाने आत्महत्या (Ahmednagar Crime News) केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारानंतर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कोपर्डीत मोठा बंदोबस्त वाढवला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग लिहिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल ऊर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्याचे तरुणाचे नाव आहे.या प्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिस कर्जत पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या चिठ्ठीत स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बबन बुद्रिक हा कोपर्डीतील निर्भयचा नातेवाईक आहे. त्यानंतर पोलीसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजे 1 मे रोजी कोपर्डी गावात यात्रा होती. या यात्रेत मृत तरुण आणि आरोपींमध्ये जोरभार भांडण झाली. भांडण झाल्यानंतर स्वप्निल सुद्रिक आणि बंटी सुद्रिक यांनी नितीनला मारहाण केली. तसेच त्याला शिवीगाळ करत नग्न करून स्मशानभूमीत बसवले.ही माहिती गावकऱ्यांकडून तरुणाच्या वडिलांना मिळाली. मुलाची चौकशी करण्याकरता त्याच्या घरी गेल्यानंतर रात्रभर नवरा घरी न आल्याचे पत्नीने सांगितले. त्यानंतर शोधाशोध केल्यानंतर स्मशानभूमीत असल्याचे तरुणाच्या लहान भावाने सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी स्मशानभूमीत धाव घेतली. त्यावेळी तरुणाने घडलेला प्रसंग सांगितला. तसेच मोबाईल, पैसे,कपडे काढून घेतल्याने स्मशानभूमीत रात्र काढावी लागली. त्यानंतर जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत नितीनने गळफास घेतला आहे.
कोपर्डीतील आरोपीच्या घरीच केली आत्महत्या
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेचा हा चुलत भाऊ आहे. कोपर्डी प्रकरणात पप्पूला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याने तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या पप्पूचा नितीन चुलत भाऊ आहे. महत्त्वाचे म्हणजे पप्पूच्या घरी म्हणजे आपल्या चुलत्याच्या घरी नितीनने आत्महत्या केली आहे. कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.त्यानंतर हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हे ही वाचा :