एक्स्प्लोर

Ahmednagar News : अहमदनगरमधील साई मिडास टच कॉम्प्लेक्सला भीषण आग, हॉस्पिटल जळून खाक

Ahmednagar News : सावेडी येथील साई मिडास टच या कॉम्प्लेक्सला मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. 

Ahmednagar News अहमदनगर : सावेडी येथील साई मिडास टच या कॉम्प्लेक्सला (Sai Midas Touch Complex) मंगळवारी भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एचडीबी फायनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल (Hospital) जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. 

नगर-मनमाड रोडवरील (Ahmednagar - Manmad Road) साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. 

कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire brigade) कळवली. अग्निशमन विभागाने तत्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला.

आजूबाजूच्या दुकानांना बसली झळ

आगीवर नियंत्रणासाठी मारलेल्या पाण्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागला. आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आजूबाजूच्या दुकानांना त्याची झळ बसली. यामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली. आकाशात धुराचे लोट दिसत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना आग पाहण्यासाठी यावेळी गर्दी केल्याचे दिसून आले. 

मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात आग

सिन्नर तालुक्यातील (Sinnar) मुसळगाव (Musalgaon MIDC) येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात 2 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला. आगीमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात (MIDC) धुराचे लोळ पसरल्याचे चित्र होते. आगीमुळे (Fire) कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कारखान्यातील 50 ते 60 कामगार सुखरूप होते. अग्निशामक बंबाद्वारे (Fire brigade) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले . आग इतकी भीषण होती की, आगीचे लोळ 10 ते 15 किलोमीटरवरून दिसत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्‍यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्‍यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्‍यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्‍यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
सुनेत्रा पवारांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची टीका; अमोल मिटकरींचा पलटवार, रोहित पवारांना केलं लक्ष्य
Parliament Special Session Delhi Political Developments : संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
संसदेचे विशेष अधिवेशन 30 नोव्हेंबरपासून; महिला आरक्षणासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी संख्याबळाची जुळवाजुळव सुरू, विरोधकांची भूमिका काय?
Pune Crime History : गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
गोळीबार, कोयत्यांचे वार आणि सूडाचं चक्र; पुण्यातल्या टोळीयुद्धाचा इतिहास कसा सुरू झाला? 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Parbhani Crime: पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पत्नीचे 12.64 लाखांचे थकीत वेतन मंजूर करण्यासाठी 1.80 लाखांची लाच; एक फोन कॉल अन् सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड; परभणीत लिपिकासह वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Mandar Kiwale Case: 'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
'माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस...'; जीवघेणे वार तरीही जगण्याची धडपड, कोर्टासमोर हल्ला झाल्यानंतर मंदार किवळेला त्याच्या केसमधील महिला वकिलांनीच दिलेला धीर
Mandar Kiwale Case: दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
दोन्ही हात निकामी; पायाच्या अंगठ्याचा ठसा देत नोंदवला जबाब, मंदार किवळे नाही तर हा होता पहिलं टार्गेट; बेल मिळाली अन् प्लॅन बदलला
Embed widget