एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जानेवारी 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जानेवारी 2020 | रविवार*
*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा*
- देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या राजपथावर भारताच्या सामर्थ्यांचं दर्शन, भारतीय हवाई दलाकडून चित्तथरारक प्रात्याक्षिकं, राज्यांच्या संस्कृतीचंही दर्शन https://bit.ly/2uyh49r
- राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, आरमार प्रमुख शूर कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्ररथाचं प्रदर्शन https://bit.ly/37tNYXk
- राज्यभरात 122 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्राची स्थापना, 10 रुपयांत गरजूंसाठी शिवभोजन थाळी, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी उद्घाटन https://bit.ly/2GsFtQ8
- शरद पवारांच्या सुरक्षेत कपात नाही, दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, दिल्लीतल्या निवासस्थानी पुन्हा सहा सुरक्षारक्षक तैनात https://bit.ly/37oxzmV
- न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणाच्या तपासाला आणखी पुरावे हवेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, सरकार नव्या पुराव्यांची वाट पाहत असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2RPn9Gv
- अदनान सामीला पद्मश्री दिल्यावरुन मनसेचा संताप, चार वर्षात अदनान सामीने काय कर्तृत्व गाजवलं?, मनसे नेते अमेय खोपकर यांचा सवाल https://bit.ly/3aFM5sp
- नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा, राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार आणि क्रिकेटपटू जहीर खानला पद्मश्री मिळाल्याने अहमदनगर जिल्ह्यात आनंदाला उधाण https://bit.ly/36t7m5a
- सीएए-एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नसीरुद्दीन शाह, मीरा नायर यांच्यासह 300 कलाकार, जनतेला लिहिलं खुलं पत्र https://bit.ly/2sUywnU
- देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आसाममधील दोन जिल्ह्यात चार शक्तिशाली ग्रेनेड स्फोट, घटनेने खळबळ मात्र कोणतीही जीवितहानी नाही https://bit.ly/3aL9R6k
- दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडवर सात विकेट्सनी विजय, पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी, केएल राहुलची धमाकेदार खेळी https://bit.ly/36oBleR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement