ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2025 | मंगळवार
1. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला 18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले, कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सेफ लँडिंग, संपूर्ण देशाला शुभांशूंच्या कामगिरीचा अभिमान https://tinyurl.com/bde8c38d
2. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, शरद पवारांच्या उपस्थितीत एकमताने निवड जाहीर, जयंत पाटलांचा राजीनामा https://tinyurl.com/46k6kpjd आर आर पाटलांप्रमाणे काम करुन दाखवणार, प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच शशिकांत शिंदेंच्या कामाची दिशा ठरली https://tinyurl.com/3udhaaz6 लोकसभेला उदयनराजेंविरोधात दंड थोपटले, विधानसभेला थोडक्यात विजय हुकला अन् आता पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष; कोण आहेत शशिकांत शिंदे? https://tinyurl.com/5dhmx5vn
3. सात वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानंतर जयंत पाटील भावूक https://tinyurl.com/mrxhuu5f इकडे राजीनामा तिकडे जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर; दादांच्या राष्ट्रवादीत यावं, मी मध्यस्थी करतो, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेचं वक्तव्य https://tinyurl.com/538hkcsc
4. वांद्रे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रश्नावरुन विधानसभेत राडा, मंत्री शंभूराज देसाईंच्या उत्तरात तत्कालिन ठाकरे सरकारचा उल्लेख, आक्रमक वरुण सरदेसाईंच्या मदतीला आदित्य ठाकरे, सभागृहात एकमेकांची लाज काढली, गुलाबराव पाटीलही देसाईंच्या बाजूने मैदानात उतरले https://tinyurl.com/4evehbv5 सभागृहातील राडा मीडियाला सांगण्यासाठी बाहेर, आदित्य ठाकरेंना मीडिया स्टँडवर नितेश राणे दिसले, शी शी म्हणत ठाकरे माघारी फिरले https://tinyurl.com/5t2jemew
5. राज्यातील 72 क्लास वन अधिकारी, माजी मंत्री हनीट्रॅपच्या सापळ्यात, पोलिसांकडे गोपनीय तक्रारी, उच्चस्तरीय गोपनीय चौकशी, ओळख गुप्त ठेवण्याची अधिकाऱ्यांची विनंती https://tinyurl.com/yz8jskpx राणेंविरुद्ध लढलो, पण पक्षाकडून मदत नाही, घरातच मान नाही तर आता बास झालं, प्रकाश महाजन मोठ्या निर्णयाच्या तयारीत! https://tinyurl.com/2sy2tkch
6. पुण्यात तीन तासांत एकाच ठिकाणी तब्बल दहा अपघात; पावसामुळं मुरुमचा चिखल झाला,प्रशासनाची मलमपट्टी जीवावर बेतणारी; घटना सीसीटीव्हीत कैद https://tinyurl.com/uyb6mmtp पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं https://tinyurl.com/4eead98p
7. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसांना अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण; मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2s3e8jtm पुण्याच्या तळजाई टेकडीवर भरतीच्या सरावासाठी गेलेल्या 'भावी' पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; म्हणाले, 'तुमची लायकी नाही पोलीस होण्याची' https://tinyurl.com/tr3s9679
8. जगप्रसिद्ध टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबईत, ठळक अक्षरात 'मराठीत नामफलक' https://tinyurl.com/7weurnrs मुंबईत टेस्ला दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता EV क्रांतीला वेग येणार, महाराष्ट्राची पॉलिसी सर्वात उत्तम https://tinyurl.com/283yzw3m 5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, एका चार्जिंगमध्ये 500 किमी प्रवास, टेस्लाच्या टॉप मॉडेलची किंमत 69.14 लाख रुपये https://tinyurl.com/2wr78mmn
9. मुंबईसह उपनगरात बरसणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर ओसरला; अंधेरीत अनेक गाड्या पाण्याखाली, विमान वाहतुकीतही व्यत्यय https://tinyurl.com/mr4byd9k घराबाहेर पडण्यापूर्वी सावधान! हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/4rnn52ef
10. क्रिकेटचं ऑलिम्पिकमध्ये कमबॅक! वेळापत्रक जाहीर, 12 जुलै 2028 रोजी सुरू होणार स्पर्धा, तर सुवर्णपदक सामना 29 जुलैला, जाणून घ्या सर्वकाही https://tinyurl.com/52f5db7n वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासातला काळा दिवस! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शून्यावर 7 जण तंबूत अन् अवघ्या 27 धावांवर संपूर्ण संघ गारद, 129 वर्षांचा लाजिरवाणा विक्रम मोडला https://tinyurl.com/3dwvf8dy
एबीपी माझा स्पेशल
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबतची पगारासाठी वणवण; आठ वर्षे पगाराविना, अजित पवारांकडे मागितली दाद https://tinyurl.com/bddz6j6d
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात एसटीच्या जादा 5000 बसेस धावणार; तिकीट दरात 50 टक्के सवलत https://tinyurl.com/5fsej3u7
कोल्हापुरी 'पायताण' सातासमुद्रापार जाणार, इटलीच्या प्राडाचे शिष्टमंडळ दाखल, कारागिराशी करार करण्यास उत्सुक https://tinyurl.com/ywejaxwy
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


















