Aasif Sheikh On Aurangzeb : औरंगजेब पवित्र व्यक्ती, राजकारणासाठी बदनाम केलं जातंय; आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य
Aasif Sheikh On Aurangzeb : मालेगावचे (Malegaon) माजी आमदार आसिफ शेख (Aasif Sheikh) यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त आणि चर्चेला वाव देणारे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे.

औरंगजेबच्या 'त्या' वक्तव्यावर ठाम...
दरम्यान, मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात माजी आमदार आसिफ शेख यांनी हे वक्तव्य केलंय. तर औरंगजेबच्या 'त्या' वक्तव्यावर मी ठाम असल्याचे ही आसिफ शेख यांनी निक्षून सांगितलं. जे आहे ते आहे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत. असेही ते यावेळी म्हणाले. मात्र त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत माजी आमदार आसिफ शेख?
इंडीयन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र ' अर्थात. इस्लाम नावाने राजकीय पक्षाची निर्मिती माजी आमदार आसिफ शेख यांनी केली असून या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली. आसिफ शेख हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी आमदार असून मध्यंतरीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी शेख यांचा 162 मतांनी पराभव केला होता. निवडणूक काळात त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नावावरही आक्षेप नोंदविण्यात आला होता.
इतर महत्वाच्या बातम्या





















