एक्स्प्लोर
LIVE : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप तब्बल 16 तासानंतर मागे घेतला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांंसाठी संप पुकारला होता.
LIVE
Background
मुंबईतील ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप तब्बल 16 तासानंतर मागे घेतला आहे. पगार वेळेवर मिळावा आणि तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांंसाठी संप पुकारला होता.
16:26 PM (IST) • 07 Aug 2017
16 तासानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
15:07 PM (IST) • 07 Aug 2017
बेस्ट कामगार कृती समितीचे सदस्य ‘मातोश्री’वर दाखल, शशांक राव, सुहास सामंत उपस्थित, उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
11:23 AM (IST) • 07 Aug 2017
मुंबई : बेस्ट संपाबाबत 3 वाजता ‘मातोश्री’वर बैठक, संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार
12:23 PM (IST) • 07 Aug 2017
मुंबईकरांची पायपीट थांबवण्याची सगळी सूत्र आता ‘मातोश्री’च्या अंगणात पोहोचली आहेत. कारण यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेचे महापौर आणि बेस्ट कृती समिती यांची ‘मातोश्री’वरच बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर या संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, तोवर मुंबईकरांची पायपीट ही सुरुच राहणार आहे.
10:15 AM (IST) • 07 Aug 2017
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या - पगार वेळेवर मिळावा, तोट्यातील बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement