एक्स्प्लोर
चार दिवसात 'ऐ दिल...' आणि 'शिवाय'मध्ये कुणाची बाजी?

1/11

करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा आणि पाकिस्तानी कलाकार फवाद खान यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमातील ऐश्वर्या राय-बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील हॉट केमेस्ट्रीमुळे प्रदर्शनापूर्वी याची सर्वत्र जोरदार चर्चा होती.
2/11

दरम्यान 2011 ते 2015 सालातील प्रदर्शित झालेल्या सिनेमांची आकडेवारी पाहिल्यास जवळपास सर्वच सिनेमांनी 100 कोटींची कमाई केली होती. तेव्हा सध्या या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवरील कमाईची कामगिरी अशीच सुरु राहिल्यास लवकरच हे दोन्ही सिनेमे देशांतर्गत 100 कोटींचा टप्पा सहज पार करतील.
3/11

पण तरीही मल्टीप्लेक्ससोबत हा सिनेमा सिंगल स्क्रिनच्या सिनेमागृहातही प्रदर्शित झाला. या सिनेमाला अजून विरोध कायम असूनही त्याचा बॉक्स ऑफिसवर त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही आहे.
4/11

त्यातच पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या सिनेमातील उपस्थितीमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला कडवा विरोध झाला. या सिनेमाला सिंगल स्क्रिनच्या सिनेमागृहात प्रदर्शित करण्यासही सिनेमा ओनर्स एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने विरोध केला होता.
5/11

तर दुसरीकडे अजय देवगनच्या 'शिवाय'ने पहिल्या दिवशी 10.24 कोटी, दुसऱ्या दिवशी 10.06 कोटी, तिसऱ्या दिवशी 8.26 कोटी आणि चौथ्या दिवशी 17.35 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे गेल्या चार दिवसात 'शिवाय'ने 45.91 कोटींची कमाई केली.
6/11

दिवाळीमुळे या दोन्ही सिनेमांनी चांगली कमाई केल्याचे अनेकांचे मत आहे.
7/11

वर्ल्डवाइड कलेक्शनमध्येही 'ऐ दिल है मुश्किल'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देशाबाहेर या सिनेमाने 121.21 कोटींचा गल्ला कमावला. या एकूण उत्पन्नातील 53.35 कोटी उत्पन्न हे नेट उत्पन्न आहे, तर 76.21 कोटी इतके ग्रॉस उत्पन्न आहे.
8/11

चित्रपट समीक्षक आणि मार्केट अनॅलिस्ट तरुण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून या दोन्ही सिनेमांच्या कमाईची माहिती दिली आहे. या दोन्ही सिनेमांच्या कमाईत जवळपास 7 कोटींचे अंतर आहे.
9/11

या दोन्ही सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी जो वाद निर्माण झाला होता, त्यावरुन अजय देवगनचा 'शिवाय' हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, चार दिवसातील बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांनी जी कमाई केली आहे, त्यावरुन वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
10/11

'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाने गेल्या चार दिवसात एकूण 53.35 कोटी कमाई केली आहे. सिनेमाने ओपनिंगच्या दिवशी 13.30 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.10 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.20 कोटी आणि चौथ्या दिवशी 17.75 कोटींची कमाई केली.
11/11

बॉक्स ऑफिसवर अजय देवगनचा 'शिवाय' आणि करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या दोन्ही सिनेमांना सरासरी ओपनिंग मिळाली, तरी गेल्या चार दिवसांतील या दोन्ही सिनेमांच्या कमाईची आकडेवारी पाहिली, तर 'ऐ दिल है मुश्किल'नेच बाजी मारल्याचं चित्र आहे.
Published at : 01 Nov 2016 07:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
