एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर आमीर खान म्हणातो...
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113920/Modi-Army-Aamir-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच देशवासियांनाही त्यांनी दिवाळीमध्ये सैनिकांची आठवण ठेवण्याचे आवाहन करुन देशवासियांनी जवानांना शुभेच्छा देण्यास सांगितले. यासाठी ट्विटरवर #Sandesh2Soldiers या नावाने एक हॅशटॅग बनवण्यात आले असून त्याच्या माध्यमातून देशातील अनेक सेलिब्रिटींसह देशवासियांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113438/PTI1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच देशवासियांनाही त्यांनी दिवाळीमध्ये सैनिकांची आठवण ठेवण्याचे आवाहन करुन देशवासियांनी जवानांना शुभेच्छा देण्यास सांगितले. यासाठी ट्विटरवर #Sandesh2Soldiers या नावाने एक हॅशटॅग बनवण्यात आले असून त्याच्या माध्यमातून देशातील अनेक सेलिब्रिटींसह देशवासियांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
2/5
![अॅक्शन हिरो अक्षय कुमारने जवानांना शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून देश आहे, अशा शब्दात अक्षयने जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113436/Akshay-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅक्शन हिरो अक्षय कुमारने जवानांना शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहात म्हणून देश आहे, अशा शब्दात अक्षयने जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
3/5
![गेल्या वर्षी आमीर खानची पत्नी किरण रावच्या देशात असुरक्षित वाटण्याची कबुली आमीरने सार्वजनिक व्यासपीठावर दिल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनीही आमीरवर चांगलेच तोंडसुख घेतलं होतं. पण आमीरने बऱ्याच काळानंतर आपले मौन सोडताना पंतप्रधानांचे कौतुक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113434/AAMIR-KHAN1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या वर्षी आमीर खानची पत्नी किरण रावच्या देशात असुरक्षित वाटण्याची कबुली आमीरने सार्वजनिक व्यासपीठावर दिल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनीही आमीरवर चांगलेच तोंडसुख घेतलं होतं. पण आमीरने बऱ्याच काळानंतर आपले मौन सोडताना पंतप्रधानांचे कौतुक केलं आहे.
4/5
![पंतप्रधानांच्या आवाहनावर अभिनेता आमीर खाननेही ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून सैन्य दलाच्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुकही केलं आहे. आमीर म्हणतो की, ''पंतप्रधानांकडून उचलेले हे पाऊल अतिशय स्तुत्य आहे. आपले पंतप्रधान योग्य आहेत. 125 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आपल्या जवानांच्या आनंदात नक्कीच भर घालतील. चला, आपण सर्वांनी मिळून वीर जवानांना शुभेच्छा देऊ!''](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113430/Aamir.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांच्या आवाहनावर अभिनेता आमीर खाननेही ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून सैन्य दलाच्या जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुकही केलं आहे. आमीर म्हणतो की, ''पंतप्रधानांकडून उचलेले हे पाऊल अतिशय स्तुत्य आहे. आपले पंतप्रधान योग्य आहेत. 125 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आपल्या जवानांच्या आनंदात नक्कीच भर घालतील. चला, आपण सर्वांनी मिळून वीर जवानांना शुभेच्छा देऊ!''
5/5
![पंतप्रधानांच्या आवाहनाला बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही प्रतिसाद देत जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करुन, ”देशाचे संरक्षण करणाऱ्या सैन्य दलाच्या जवानांना आणि तरुणांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना हॅप्पी दिवाली!” #Sandesh2Soldiers](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/25113428/2216.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांच्या आवाहनाला बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही प्रतिसाद देत जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सलमान खानने पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर करुन, ”देशाचे संरक्षण करणाऱ्या सैन्य दलाच्या जवानांना आणि तरुणांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना हॅप्पी दिवाली!” #Sandesh2Soldiers
Published at : 25 Oct 2016 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)