एक्स्प्लोर
'लाल सिंह चड्डा'च्या शुटिंगमधून आमिर खानचा ब्रेक; अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील फोटो व्हायरल
आमिरने आपल्या शुटिंगमधून थोडासा ब्रेक घेतला असून या ब्रेकमध्ये तो अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता. सुवर्ण मंदिरातील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आपला आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्डा'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण आमिरने आपल्या शुटिंगमधून थोडासा ब्रेक घेतला असून या ब्रेकमध्ये तो अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता. सुवर्ण मंदिरातील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुपरस्टार आमिर खानच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
फोटोंमध्ये आमिर खान पांढऱ्या रंगाचा रूमाल डोक्यावर बांधून सुवर्ण मंदिरात दिसत आहे. आमिरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी आमिर खानने 'लाल सिंह चड्डा' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. या लूकमध्ये आमिरने पगडी घातलेली आहे, तसेच त्याने दाढीही वाढवलेली दिसत आहे.Actor Aamir Khan offers prayers at Gurudwara Harmandir Sahib (Golden Temple) in Amritsar. He is in Punjab for shooting of his upcoming film #LalSinghChaddha pic.twitter.com/jyZMW6LzWQ
— ANI (@ANI) November 30, 2019
गेल्या काही दिवसांपासून आमिर वाढलेल्या दाढीमध्ये अनेकदा दिसून आला होता. याशिवाय 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही समोर आले होते. त्यानंतर सिनेमाचा ऑफिशियल फर्स्ट लूक समोर आला आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकचा फोटो आमिरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. "सत श्री अकाल. मी लाल सिंह चड्ढा", असं आमिरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. दरम्यान, 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खान सिनेमात एक पंजाबी व्यक्तीरेखा साकारत आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा 1994 ला रिलीज झालेल्या रॉबर्ट जेमेकिसच्या ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमावर आधारित आहे. 'फॉरेस्ट गम्प' सिनेमात टॉम हँग्स आणि रॉबिन राईट मुख्य भूमिकेत होते. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि आमिर खान प्रोड्युस करत आहेत. अद्वैत चंदन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. संबंधित बातम्या : 'दबंग 3'मधील गाणं रिलीज; सलमान-वरीनासोबत प्रभुदेवाचाही जबरदस्त डान्स Laal Singh Chaddha First Look | आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'मधील फर्स्ट लूक रिलीज 'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित विकी कौशलच्या घड्याळाच्या किमतीत खरेदी करू शकता SUV कार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
भारत
अर्थ बजेटचा 2025
Advertisement