एक्स्प्लोर
विकी कौशलच्या घड्याळाच्या किमतीत खरेदी करू शकता SUV कार!
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक फॅन्सच्या मनावर राज्य करत आहे. उरी, संजू आणि राझी यांसारख्या चित्रपटांमध्ये कमालीचा अभिनय करणाऱ्या विक्की कौशलने आपल्या लाइफस्टाइलमध्येही अनेक बदल केले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक फॅन्सच्या मनावर राज्य करत आहे. उरी, संजू आणि राझी यांसारख्या चित्रपटांमध्ये कमालीचा अभिनय करणाऱ्या विक्की कौशलने आपल्या लाइफस्टाइलमध्येही अनेक बदल केले आहेत.
विकी कौशलने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एक घड्याळ घातलं आहे. ब्लॅक जॅकेट आणि कोटमध्ये विकी फार डॅशिंग दिसतोय. पण विक्कीच्या लूकऐवजी फॅन्समध्ये त्याच्या घड्याळाच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही अंदाज लावू शकता का? विकीच्या घड्याळाची किंमत साधारण किती असेल? 1 लाख, 2 लाख नाहीतर त्याच्या घड्याळाची किंमत तब्बल 22 लाख 80 हजार रुपये आहे. म्हणजेच, विकीच्या घड्याळाच्या किमतीमध्ये एक SUV गाडी अगदी सहज खरेदी करणं शक्य आहे. विक्की कौशल सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो आणि आपल्या डेली रुटिनचे फोटोही अपडेट करत असतो.View this post on Instagram
दरम्यान, विकी कौशलच्या दर्जेदार अभिनयाने गाजलेला चित्रपट 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' नंतर आता फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विक्की सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असून ज्यामध्ये भूत, सरदार उधम सिंह आणि सॅम मानेकशॉ यांचा बायोपिक यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अरजित सिंह यांचं अल्बम सॉन्ग 'पछताओगे'मध्येही विक्की कौशल दिसून आला होता. या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यावर अनेक टिक टॉक व्हिडीओही शेअर करण्यात आले होते.View this post on Instagram
आणखी वाचा























