Sita Ramam Movie Review : मणिरत्मच्या 'रोजा'ची आठवण करुन देणारा 'सीता रामम'
Sita Ramam Movie Review : प्रेम आणि प्रेम पत्रांची एक अतिशय गोड प्रेमकथा 'सीता रामम' या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
hanu raghavapudi
दुलकर सलमान, रश्मिका मंदान्ना, मृणाल ठाकूर
Sita Ramam Movie Review : गेल्या अनेक दिवसांपासून 'सीता रामम' (Sita Ramam) हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 'सीता रामम' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमात 60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान (Dulkar Salman), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 'सीता रामम' ऐकल्यानंतर डोळ्यासमोर येतात ते 'राम आणि सीता' पण 'राम-सीता' आणि 'सीता रामम'चा काहीही संबंध नाही याचा अंदाज सिनेमा पाहिल्यावर येतो.
प्रेम आणि प्रेम पत्रांची सांगड घालणारा 'सीता रामम'
प्रेम आणि प्रेम पत्रांची एक अतिशय गोड प्रेमकथा 'सीता रामम' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन आल्याबद्दल दिग्दर्शक हनु राघवपुडीचं कौतुक. 'सीता रामम' या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तानामध्ये 1971 साली घडलेल्या युद्धावर आधारित आहे. 60 ते 80 या दशकातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर भाष्य करणारा 'राम-सीता' हा सिनेमा आहे.
'सीता रामम' हा रहस्यमय सिनेमा दोन कालखंडावर भाष्य करणारा आहे. थरार-नाट्य असलेला हा सिनेमा क्षणाक्षणाला प्रेक्षकांना कोड्यात टाकणारा आहे. समाज, चालीरीती अशा अनेक गोष्टी सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी एक नवीन ट्विस्ट असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. हैदराबादपासून काश्मीरपर्यंत हा सिनेमा विस्तारलेला आहे.
नव्या पिढीने 'सीता रामम' हा सिनेमा पाहणे गरजेचे आहे. कारण या सिनेमाची कथा डोळे उघडणारी आहे. हनु राघवपुडीने अतिशय बारकाईने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर रश्मिका मंदान्नाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळी छाप सोडली आहे.
'सीता रामम' या सिनेमाचं कथानक उत्तम असलं तरी दोन तास चाळीस मिनिटांच्या या सिनेमात काही अनावश्यक गोष्टीदेखील दाखवण्यात आल्या आहेत. पण तरीही हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आहे. वीकेंड चांगला घालवण्यासाठी प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात.