IB71 Movie Review: विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांचा IB71 कसा आहे? वाचा रिव्ह्यू
IB71 या चित्रपटात एका भारतीयाची आणि त्याच्या साथीदारांची कथा दाखवण्यात आली आहे.
संकल्प रेड्डी
विद्युत जामवाल, अनुपम खेर, विशाल जेठवा
IB71 Movie Review: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या विषयावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली आहे. IB71 या चित्रपटात एका भारतीयाची आणि त्याच्या साथीदारांची कथा दाखवण्यात आली आहे.
IB71 ची कथा
1971 ची गोष्ट IB71 या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. जेव्हा पाकिस्तान हा देश चीनसोबत भारतावर हल्ला करण्याची योजना आखत होता. अशा परिस्थितीत त्यांना थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हवाई क्षेत्र बंद करणे, पण तसे करण्यासाठी ठोस कारण हवे होते. अशा परिस्थितीत एका भारतीय एजंटने पाकिस्तानला पराभूत करण्याचा डाव आखला. विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेण्यात आले. मग काय झाले? भारतीयांना यश मिळाले का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला IB71 या चित्रपटामध्ये मिळतील.
कलाकारांचा अभिनय
IB71 या चित्रपटाची निर्मिती विद्युत जामवालनं (Vidyut Jammwal) केली आहे. देशाच्या रिअल हिरोला अभिवादन करणारा चित्रपट त्याने बनवला आहे, याबद्दल त्याचे कौतुक करावे लागेल. या चित्रपटात तुम्हाला विद्युत चा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात 70 च्या दशकातील लूकमध्ये विद्युत चांगला दिसत आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आयबी प्रमुखाची भूमिका साकारली आहे. अनुपम खेर हे एक उत्तम अभिनेते आहेत आणि इथेही त्यांनी त्यांच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. विशाल जेठवाचं कामही जबरदस्त आहे.
IB71 या चित्रपटामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. अनावश्यक गाणी टाकून चित्रपट ओढला गेला आहे किंवा कंटाळा आला आहे, असे कुठेतरी तुम्हाला वाटत नाही. चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे, 70 चे दशक उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट सुमारे दोन तासांचा आहे. या चित्रपटात एकामागून एक पटकन ट्विस्ट आणि टर्न येतात हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.
चित्रपटाच्या शेवटी ज्या प्रकारे भारतीय एजंट पाकिस्तानातून निघून येतो, तो सिन घटकतो. पण शेवटी भारतीय एजंट ज्या प्रकारे पाकिस्तानातून (Pakistan) भारतात (India) परत येतात, ते पाहून अभिमान वाटतो. संकल्प रेड्डी यांचे दिग्दर्शन चांगले आहे. चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत चित्रपटाच्या सिन्सला साजेसे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
IB 71 Teaser Release: विद्युत जामवालच्या IB 71 चा टीझर रिलीज; 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची दिसली झलक