LIVE UPDATE | अंबरनाथमध्ये मनसेच्या उमेदवारावर मारहाणीचा गुन्हा दाखल

Background
1. आरे प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचं पत्र, सरन्यायाधीशांकडून विशेष दाखल
2. विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, प्रचार सोडून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचा बंडोबांशी फोनवरुन संवाद, भाजपसमोर 27 मतदारसंघात 144 बंडखोरांचं आव्हान
3. राज ठाकरेंच्या पहिल्यावहिल्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, सभेच्या जागेसाठी मनसेचे शर्थीचे प्रयत्न, अलका चौकात सभा घेण्याचा मनसेचा इशारा,
4. महात्मा गांधींच्या अस्थी चोरुन फोटोखाली 'गद्दार' लिहिले, तुषार गांधींना अश्रू अनावर
5. नोकरी-धंद्याची स्थिती आणखी बिकट होण्याची भारतीयांना भीती, आरबीआयच्या सर्वेक्षणादरम्यान नोंदवलं मतं, तर पुढच्या वर्षी स्थिती सुधारण्याची अनेकांना आशा
6. भुसावळमध्ये अंधाधुंद गोळीबारात 5 जणांची हत्या, भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्या परिवारावर अज्ञातांचा गोळीबार, 3 संशयित ताब्यात























