महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल Live Update
LIVE
Background
मुंबई : राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. आज, 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे.
कशी होईल मतमोजणी
एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदारसंघातील पाच बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.
प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त
मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
राज्यात विधानसभेसाठी 61.13 टक्के मतदान
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाले आहे. तसेच सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. राज्यात 4 कोटी 68 लाख 65 हजार 385 पुरुष, 4 कोटी 28 लाख 35 हजार 374 स्त्रिया आणि 2 हजार 637 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 97 लाख 3 हजार 396 मतदारांपैकी एकूण 5 कोटी 48 लाख 38 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये 2 कोटी 94 लाख 73 हजार 184 पुरूष, 2 कोटी 53 लाख 64 हजार 665 स्त्रिया आणि 666 तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत 62.89 टक्के पुरुष, 59.21 टक्के स्त्रिया आणि 25.26 टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Vidhan Sabha Election 2019 Results : मतदारसंघांचे अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं आहे. ‘एबीपी माझा’ही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पहिले कल हाती येण्यास सुरुवात होईल. एबीपी माझावर सकाळी सहा वाजल्यापासून निकालाचं नॉनस्टॉप महाकव्हरेज सुरु होईल. टीव्हीशिवाय तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. टीव्हीसोबत वेबसाईट, फेसबुक, ट्विटरपासून अॅपवरील नोटिफिकेशनद्वारे एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट निकाल पोहोचवण्यासाठी एबीपी माझानेही खास तयारी केली आहे. वेबसाईटसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही एबीपी माझाची टीम तैनात असेल. एबीपी माझाच्या साईटवर महाराष्ट्रातील मतदारसंघांची टॅली, लाईव्ह टीवी, लाईव्ह अपडेट आणि ब्रेकिंग न्यूजद्वारे कोणता पक्ष आघाडीवर कोणता पिछाडीवर याची माहिती मिळेल. याशिवाय तुम्ही राज्यातील व्हीआयपी उमेदवारांची परिस्थितीही वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही केवळ स्वत:च्याच नाही तर राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचे लाईव्ह अपडेट वाचू शकता. प्रत्येक मतदारसंघाशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तुम्हाला मिळेल.
तुम्ही टीव्ही आणि वेबसाईटशिवाय मोबाईल फोन आणि इतर तमाम प्लॅटफॉर्मवर निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
तुमच्या अँड्रॉईड किंवा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इन्स्टॉल करुन लाईव्ह टीव्ही पाहू शकता. तुमच्याकडे अॅप असेल तर नोटिफिकेशनद्वारेही निकाल मिळतील.
एका क्लिकवर विधानसभा मतदारसंघाची माहिती
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला विधानसभा मतदारसंघांचा निकाल पाहू शकता. सोबतच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात कोणाचा विजय झाला होता, कोण पराभूत झालं होतं. दोन्ही पक्षांमध्ये किती मतांचं अंतर होतं. तसंच मतदारसंघात किती मतदार आहेत, त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती याची माहितीही मिळणार आहे.