LIVE BLOG : चेन्नईचा राजस्थानवर 8 धावांनी विजय

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. विदर्भातील जिल्ह्यांना कडक उन्हाच्या झळा, अकोल्यात पाऱ्याची 43 तर परभणीत 41 अंशापर्यंत उसळी, पारा आणखी वाढण्याची शक्यता
2. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, एक जखमी, तर शनिवारी सकाळी जवानांच्या गाडीजवळ कारचा स्फोट
3. निवडणुकीच्या तोंडावर पैशांच्या गैरव्यवहारावर कारवाईचा धडाका, बनावट नोटांप्रकरणी मुंब्र्यातून तिघांना अटक
4. मुलगा सुजयच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राधाकृष्ण विखेंची अखेर काँग्रेसच्या बैठकीला हजेरी, भाजपचा उघड प्रचार करूनही काँग्रेसकडून कारवाई नाही
5. किरीट सोमय्या केंद्रीय मंत्री पियुष गोयलांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तर जागेबाबत निर्णय योग्य वेळी जाहीर करणार, विनोद तावडेंचा दावा
6. दिल्ली कॅपिटल्सनं केला कोलकाता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, पृथ्वी शॉचं शतक एका धावेनं हुकलं


















