World Population Day : 'जेव्हा जगाची लोकसंख्या 5 अब्जांच्या पुढे गेली..!' जागतिक लोकसंख्या दिनाची सुरूवात कशी झाली? उद्देश काय?
World Population Day 2024 : आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस.. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या काही मार्गांनी फायद्याची तर काही मार्गांनी हानिकारक आहे.
World Population Day 2024 : भारत देशासह जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. सतत वाढत जाणारी लोकसंख्या काही मार्गांनी फायद्याची तर काही मार्गांनी हानिकारक आहे. जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस..या निमित्त जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली? यामागचा उद्देश काय? जाणून घ्या..
...म्हणून जागतिक लोकसंख्या दिवस जगभरात साजरा केला जातो
दरवर्षी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा पुढाकार डॉ.के.सी.जकेरिया यांनी घेतला होता. सतत वाढत जाणारी लोकसंख्या काही मार्गांनी फायद्याची तर काही मार्गांनी हानिकारक आहे. लोकांना वाढत्या लोकसंख्येचे धोके आणि फायद्यांबद्दल जागरूक करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम आणि संदेशाद्वारे लोकांचे लक्ष वाढत्या लोकसंख्येकडे वेधले जाते. या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरुवात कशी झाली आणि या वर्षीची थीम काय आहे? जाणून घेऊया...
जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कशी झाली?
1989 साली संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. 1987 मध्ये या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्जांच्या पुढे गेली, तेव्हा हा दिवस साजरा करण्याची कल्पना आली. हा दिवस साजरा करण्याची सूचना डॉ. के. सी. जकेरिया यांनी केली. जागतिक लोकसंख्या दिनाची स्थापना 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे करण्यात आली. पहिला लोकसंख्या दिवस 11 जुलै 1990 रोजी साजरा करण्यात आला.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा उद्देश
सध्या जगाची लोकसंख्या 8 अब्जांपेक्षा जास्त आहे. हा दिवस वाढत्या लोकसंख्येच्या विकास आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकतो. लोकसंख्येच्या वाढीमुळे सकारात्मक परिणामांपेक्षा नकारात्मक परिणाम अधिक दिसत आहेत, ज्याबद्दल लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दिवशी लोकांना लैंगिक समानता, पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाबद्दल महत्त्व सांगितले जाते.
जागतिक लोकसंख्या दिवस 2024 ची थीम
जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची थीम "सर्वांची गणना" आहे. ही थीम जगभरातील लोकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी लोकसंख्या डेटा गोळा करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
2023 वर्षाची थीम - स्त्री-पुरुष समानतेची शक्ती
2022 हे वर्ष 8 अब्जांच्या जगाच्या थीमसह साजरा करण्यात आला.
हेही वाचा>>>
Health : सतत 9 तास लॅपटॉपवर काम करताय? 'कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' माहित आहे? सुरुवातीची लक्षणे ओळखता येत नाहीत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )